Shani Pradosh Vrat 2025 : शनि प्रदोष व्रताला जुळून येणार शुभ योग; 24 मे पासून 'या' 3 राशींवर भगवान शंकराची आणि शनिदेवाची असणार कृपादृष्टी
Shani Pradosh Vrat 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनि प्रदोष व्रताच्या दिवशी यंदा आयुष्मान आणि सौभाग्य योग असे शुभ योग जुळून आले आहेत.

Shani Pradosh Vrat 2025 : हिंदू पंचांगानुसार, 24 मे 2025 रोजी म्हणजेच येत्या शनिवारी शनि प्रदोष तिथीचा उपवास ठेवला जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीा प्रदोष तिथीचा उपवास केला जातो. जेव्हा प्रदोष तिथी शनिवारी येते तेव्हा या तिथीला शनि प्रदोष व्रत म्हणतात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनि प्रदोष व्रताच्या दिवशी यंदा आयुष्मान आणि सौभाग्य योग असे शुभ योग जुळून आले आहेत. यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. या शुभ योगामुळे तीन राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या शुभ राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनि प्रदोष व्रत फार लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वातले चांगले गुण दिसून येतील. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. या काळात जर तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असल्यास तुम्ही सुरु करु शकता. भगवान शंकराच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांना या काळात चांगला धनलाभ मिळेल. तसेच, समाजात तुमची वेगळी प्रतिमा तयार होईल. भगवान शंकराच्या कृपेने नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनीदेवाची ही मूलत्रिकोण रास आहे. या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. तसेच, शनि प्रदोष तिथीच्या दिवशी जुळून येणाऱ्या शुभ योगामुळे तुमच्या संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या काळात तुम्ही यात्रेला देखील जाऊ शकता. तसेच, भगवान शंकराच्या कृपेने तुम्ही नवीन घर किंवा प्रॉपर्टी देखील खरेदी करु शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















