Astrology : आज गजकेसरी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह 'या' 5 राशींना मिळणार लाभच लाभ, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत
Astrology Panchang Yog 22 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या शुभ राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 22 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 22 मे म्हणजेच आजचा वार गुरुवार. आज गुरु ग्रहाचा सर्वात जास्त प्रभाव असणार आहे. तसेच, चंद्राने मीन राशीत प्रवेश करुन आज गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर, आज सुनफा योग आणि कला योगासह अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या शुभ राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. तसेच, नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. परदेशातून तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचं सोशल नेटवर्किंग फार चांगलं होणार आहे. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. वैवाहिक जीवन फार सुखी राहील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. तसेच, जर तुम्हाला नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. तुमच्या व्यवसायात कामाच्या नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. आयटी, डिजीटल मार्केटिंग, स्टार्टअपशी संबंधित लोकांना आज चांगला लाभ मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. आज तुम्ही तुमची नियोजित कामे अगदी वेळेत पूर्ण कराल. तसेच, व्यवसाय समजुतदारीने आणि व्यावहारिक ज्ञानाने कराल. तुमच्या आजूबाजूचं वातावरण अनुकूल राहील. जे तरुण लग्नासाठी उभे आहेत त्यांना लवकरच चांगला जोडीदार भेटेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज नशिबाची चांगली साथ तुम्हाला मिळेल. त्याचबरोब, तुमच्या कामाचं तुमच्या बॉसकडून चांगलं कौतुक होईल. त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग तुमच्यासमोर उपलब्ध होतील. तसेच, तुमच्या आजूबाजूला आनंदी वातावरण असेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस फार भाग्याचा असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तुमच्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. इतरांबरोबर तुमचा व्यवहार चांगला असेल. तसेच, आज कोणताही मोठा निर्णय घेताना तुमचा आत्मविश्वास दिसून येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















