Shani Mangal Yuti 2025 : 28 जुलैचा काळ संकटाचा शनी-मंगळ युतीने बनणार भयानक समसप्तक योग; 'या' राशी असतील धोक्यात
Shani Mangal Yuti 2025 : येत्या 28 जुलै रोजी मंगळ ग्रह आपल्या शत्रू ग्रह म्हणजेच बुधाच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर, शनि देव (Shani Dev) मीन राशीत संक्रमण करणार आहेत.

Shani Mangal Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करताना अनेक शुभ-अशुभ योग निर्माण करतात. याचा प्रभाव मानवासह देश विदेशात पाहायला मिळतो. तर, येत्या 28 जुलै रोजी मंगळ ग्रह आपल्या शत्रू ग्रह म्हणजेच बुधाच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर, शनि देव (Shani Dev) मीन राशीत संक्रमण करणार आहेत. त्यामुळे मंगळ (Mars) आणि शनी ग्रह एकमेकांसमोर येऊन समसप्तक योग निर्माण करणार आहेत. यामुळे काही राशींच्या अडचणीत वाढ होऊ शकते. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी शनि आणि मंगळ ग्रहाची युती फार नुकसानकारक ठरणार आहे. या राशीच्या मंगळ ग्रह सहाव्या चरणात आहे तसेच बाराव्या चरणात शनि महाराज विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुमचे पैसे विनाकारण खर्च होतील. आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागेल. तसेच, कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमच्या कामात दिरंगाई येऊ शकते. या राशीवर शनिची साडेसाती सुरु असल्या कारणाने सावधान राहण्याची गरज आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शनी आणि मंगळ ग्रहाचा मिळून निर्माण होणारा समसप्त योग मिथुन राशीच्या लोकांसाठी फार प्रतिकूल ठरणार आहे. या राशीच्या लोकांच्या करिअरवर याचा सर्वात जास्त प्रभाव दिसून येईल. तसेच, तुमच्या आरोग्यावर याचा परिणाम दिसून येईल. या काळात कोणतीच महत्त्वाची कामे हातात घेऊ नका. तसेच, आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. कोणत्याच प्रकारचा हलगर्जीपणा करु नका.
कर्क रास (Cancer Horoscope)
शनि आणि मंगळ ग्रहाचा अशुभ योग कर्क राशीसाठी फार नुकसानकारक ठरणार आहे. या राशीत सूर्य देव स्थित आहेत. तसेच, 17 ऑगस्ट रोजी केतू या राशीत दुसरे चरण चालणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनहानी देखील होऊ शकते. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. विनाकारण पैसे खरर्च करु नका. तसेच, तुम्हाला मानसिक तणावाचा देखील सामना करावा लागू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :















