Astrology : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जुळून आला 'धन योग'; मिथुनसह 'या' 5 राशींच्या लोकांना नववर्षात होणार धनलाभ
Astrology Panchang 01 January 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा 5 राशीच्या लोकांना चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशीच्या लोकांच्या मेहनतीला यश मिळेल.
Astrology Panchang 01 January 2025 : आज 1 जानेवारी म्हणजेच, नवीन वर्षाचा (New Year) पहिला दिवस असल्या कारणाने आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. तसेच, आज पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी असल्या कारणाने आजचा दिवस खास आहे. तसेच, आज धन योगसह (Yog) हर्षण योग आणि उत्तराषाढ नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा 5 राशीच्या लोकांना चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशीच्या लोकांच्या मेहनतीला यश मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात मन रमेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुम्हाला सकाळी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. आज तुमच्या घरी नवीन पदार्थ बनवले जाऊ शकतात. तसेच, मित्रांबरोबर तुमच्या भेटीगाठी होतील. तसेच, जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायक असणारआहे. तुमच्या पाठी आई-वडिलांचा आशीर्वाद असेल त्यामुळे जे काही कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमच्या बॅंक बॅलेन्समध्ये चांगली वाढ होईल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात जाईल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखकारक असणार आहे. आज सकाळपासूनच तुम्हाला खूप ऊर्जावान वाटेल. तसेच, तुमचं आरोग्य देखील उत्तम असणार आहे. भगवान गणेशाची तुमच्यावर विशेष कृपा असेल. तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, तुमच्या घरात शुभ कार्याचं आयोजन केलं जाऊ शकते. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. संध्याकाळचा वेळ तुमचा मित्र परिवाराबरोबर आनंदात जाईल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. नवीन वर्षाच्या अनुषंगाने तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तसेच, धनसंपत्तीत तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. तुमचे रखडलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. तसेच, मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी कामे वेळेत पूर्ण होतील. संध्याकाळचा वेळ तुमचा चांगला जाईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: