(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Gochar 2024 : शनीच्या संक्रमणामुळे 'या' 3 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; 2025 मध्ये सावधानतेचा इशारा
Shani Gochar 2024 : मीन राशीत संक्रमण केल्याने काही राशींसाठी हा काळ फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती फार ढासळणार आहे.
Shani Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी (Shani Dev) 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत संक्रमण केल्याने काही राशींसाठी हा काळ फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती फार ढासळणार आहे. तसेच, तुमच्या तब्येतीतही काही सुधारणा होणार नाही. त्यामुळे शनीच्या (Lord Shani) संक्रमणाच्या या काळात काही राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी शनीचं हे संक्रमण आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक नसणार आहे. या काळात तुमच्या आरोग्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात विशेष बदल करावा लागेल. तसेच, या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे अन्यथा तुमची जवळची माणसं तुमच्यापासून दुरावू शकतात. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनातही अनेक आव्हानांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फार आव्हानात्मक असणार आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीचे लोक संक्रमणाच्या या काळात आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुमची तब्येत पुन्हा बिघडण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात जास्त परिश्रम करु नका. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबातील समस्यांना घेऊनसुद्धा फार चिंतेत असाल. तुमच्या घरात प्रॉपर्टीच्या संदर्भात वाद पाहायला मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला शक्य असल्यास या काळात जास्तीत जास्त योग, व्यायाम आणि ध्यान करण्याचा प्रयत्न करा.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फार आव्हानात्मक असणार आहे. तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. कुंभ रास ही शनीचीच रास आहे मात्र तरीही या काळात तुम्हाला कष्ट घेण्याची गरज आहे. कोणतंच फळ तुम्हाला मेहनत न करता मिळणार नाही. तुमच्या आरोग्यातही अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. पैशांच्या बाबतीत तुम्हाला आर्थिक चणचण जाणवेल. यासाठी पैशांचा गैरवापर करु नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :