Shani Margi 2022 : शनीची थेट चाल 'या' राशींना बनवणार धनवान! शनि कधी होणार मार्गी, जाणून घ्या
Shani Margi 2022, Shani Vakri 2022 : ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनि वक्री असतो तेव्हा त्याची हालचाल आणखी कमी होते. यामागे असे मानले जाते की, सर्व ग्रहांमध्ये शनीची हालचाल खूपच मंद आहे.
Shani Margi 2022, Shani Transit 2022, Shani Vakri 2022 : 5 जून 2022 रोजी शनी वक्री झाला होता. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनि वक्री असतो तेव्हा त्याची हालचाल आणखी कमी होते. यामागे असे मानले जाते की, सर्व ग्रहांमध्ये शनीची हालचाल खूपच मंद आहे. यामुळेच शनिदेवाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. पौराणिक कथेनुसार, रावणाने शनिदेवाच्या पायावर गदा मारली होती, तेव्हापासून शनिची चाल हळू आहे.
काही राशींना अडचणींचा सामना
शनि वक्री म्हणजे शनीची उलटी हालचाल. म्हणजेच शनि जेव्हा वक्री होतो, तेव्हा काही राशींना अडचणींचा सामना करावा लागतो. शनी उलट दिशेने चालणे कठीण आहे. त्यामुळे त्यांचा वेग अधिक मंदावतो. दरम्यान, शनी 141 दिवसांनंतर पुन्हा मार्गस्थ होईल.
शनि मार्गी 2022
पंचांगानुसार, 23 ऑक्टोबर 2022 रोजी, रविवारी सकाळी 9:37 वाजता शनी मार्गी होईल. म्हणजेच या दिवसापासून शनि पुन्हा आपल्या गतीत येईल.
शनि मार्गी 2022 कुंडली
शनिमार्गीचा प्रभाव सर्व 12 राशींवर राहील. ज्यांना शनीची साडेसाती आणि शनीची ढैय्यै आहे, त्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. यावेळी कर्क, वृश्चिक राशीवर ढैय्या. मकर, कुंभ आणि मीन राशीत साडेसाती चालू आहे. यासोबतच वृषभ, कन्या आणि धनु राशीच्या लोकांसाठी शनि धनाची स्थिती निर्माण करू शकतो. शनिदेवाची शुभता वाढवण्यासाठी शनिवारी शनि मंदिरात शनिशी संबंधित वस्तूंचे दान करा. लाभ मिळेल. यासोबतच शनि मंत्र आणि शनि चालिसाचे पठण केल्यानेही लाभ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :