Shani Dev : शनीच्या मार्गी चालीने 'या' 4 राशींचं भाग्य उजळणार; हाती घेतलेल्या कामात येईल यश, मेहनतीचं मिळेल फळ
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीने 30 जून 2024 रोजी वक्री चाल केली होती त्यानंतर आता 15 नोव्हेंबर 2024 रोजी शनी मार्गी होणार आहेत.
Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Lord Shani) सर्वात शक्तिशाली ग्रह मानतात. शनीची (Shani Dev) वक्री चाल ज्योतिष शास्त्रात फार अशुभ मानली जाते. शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे शनीच्या वक्री चालीपासून सगळे खूप घाबरतात.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनीने 30 जून 2024 रोजी वक्री चाल केली होती त्यानंतर आता 15 नोव्हेंबर 2024 रोजी शनी मार्गी होणार आहेत. शनी जेव्हा वक्री होतात तेव्हा सर्व 12 राशींवर याचा शुभ आणि अशुभ परिणाम होतो. मात्र, या 4 राशी अशा आहेत ज्यांना शनीच्या सरळ चालीने शुभ परिणाम मिळणार आहेत. या 4 लकी राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
शनीच्या मार्गी झाल्याने कर्क राशीच्या लोकांना करिअर, व्यापार, नोकरीत चांगली प्रगती पाहायला मिळेल. या दरम्यान तुम्ही तुमचं ध्येय गाठण्यात यशस्वी व्हाल. शनीच्या संक्रमणाने या राशीला उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. तसेच, आर्थिक स्थिती चांगली सुधारेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. तसेच, आरोग्यही उत्तम राहील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
शनीचं संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुमचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. तसेच, नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशनही मिळू शकतं. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच, तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी शनीचं संक्रमण भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला लाभ मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांच्या पगारात चांगली वाढ पाहायला मिळेल. विशेषत: शेअर मार्केटशी संबंधित लोकांना याचा चांगला लाभ मिळेल. जोडीदाराबरोबर तुमचं नातं अधिक घट्ट होईल. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचं संक्रमण अत्यंत शुभ असणार आहे. तसेच, या काळात तुमच्या स्वभावात देखील चांगला बदल जाणवेल. व्यापारी वर्गातील लोकांना कामाच्या नवीन ऑफर्स मिळतील. तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न असेल. आरोग्यात चांगली सुधारणा होईल. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ शुभ आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :