एक्स्प्लोर

Sankashti Chaturthi 2024 : संकष्ट चतुर्थीला ‘असे’ करा व्रत बाप्पा करेल इच्छा पूर्ण; तुमच्या शहरानुसार चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या

Sankashti Chaturthi 2024 : संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचा विशेष विधी आहे, त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही.

Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीच्या (Sankashti Chaturthi) व्रताला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. त्यानुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान गणेशाची विधिवत पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याची परंपरा आहे. आज संकष्ट चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच, आज संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची शुभ वेळ काय असणार आहे ते जाणून घेऊयात.  

संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचा विशेष विधी आहे, त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. या वर्षी संकष्टी चतुर्थीला विविध योग जुळून आले आहेत, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. संकष्टी चतुर्थी 2024 चे शुभ योग, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया.

संकष्टी चतुर्थी 2024 तिथी, शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आज म्हणजेच 20 ऑक्टोबरला आहे. आज संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त सकाळी 06 वाजून 46 मिनिटांनी सुरु झाला आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 04 वाजून 16 मिनिटांनी हे व्रत संपेल.

संकष्टी चतुर्थी 2024 चंद्रोदय वेळ

संकष्टी चतुर्थीची वेळ ही प्रत्येक शहरानुसार वेगळी असते. त्यानुसार मुंबईत चंद्रोदयाची वेळ रात्री 08 वाजून 35 मिनिटांनी असणार आहे. या वेळेत तुम्हाला चंद्राचं दर्शन घेता येईल. या वेळेस चंद्राची पूजा करावी. संकष्ट चतुर्थीला चंद्राशिवाय पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानलं जातं. त्यामुळे चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत सोडावं. 

तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या

मुंबई - 08.35
बीड - 08.23
ठाणे - 08.34
सांगली - 08.33
पुणे - 08. 32
सावंतवाडी - 08.38
रत्नागिरी - 08.38
 सोलापूर - 08.25
कोल्हापूर - 08.35
नागपूर - 08.03
सातारा  - 08.33
अमरावती - 08.10
 नाशिक - 08.28
अकोला - 08.13
अहमदनगर -08.27
औरंगाबाद - 08.22
पणजी - 08.39
भुसावळ- 08.18
धुळे - 08.22
परभणी - 08.18
जळगाव - 08.19
नांदेड-08.15
वर्धा - 08.07
उस्मानाबाद - 08.23 
यवतमाळ- 08.09
 भंडारा - 08.01 
चंद्रपूर - 08.06
बुलढाणा - 08.17
इंदौर- 08.13
ग्वाल्हेर - 07.54
बेळगाव - 08.35
मालवण- 08.39

संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत

  • संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे घाला. 
  • त्यानंतर आंघोळ करून विधीनुसार गणेशाची पूजा करावी. 
  • सर्वात आधी गणपतीची मूर्ती फुलांनी सजवावी. 
  • देवाला चंदनाचा टिळा लावावा. फुले आणि पाणी अर्पण करा.
  • त्यानंतर श्रीगणेशाला मोदक अर्पण करा. 
  • अगरबत्ती पेटवा आणि श्रीगणेशाच्या मंत्राचा जप करा. 
  • उपवास करत असाल तर अन्नाचे सेवन अजिबात करू नका. 
  • संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी गणेशाची पूजा करून संकष्टी व्रत कथा वाचावी.
  • रात्री चंद्र पाहून उपवास सोडावा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Sankashti Chaturthi 2024 : आज संकष्ट चतुर्थीचा दिवस! जाणून घ्या पूजा, विधी आणि शुभ मुहूर्ताची अचूक वेळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट शिंदेंच्या दरबारी
दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट शिंदेंच्या दरबारी
Vijay Wadettiwar: काँग्रेसचे नेते हायकमांडला म्हणाले ठाकरेंसमोर झुकणार नाही, 17 जागांवरुन जुंपली, विजय वडेट्टीवार म्हणाले..
काँग्रेसचे नेते हायकमांडला म्हणाले ठाकरेंसमोर झुकणार नाही, 17 जागांवरुन जुंपली, विजय वडेट्टीवार म्हणाले..
Satyajeet Tambe : मोठी बातमी: सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानसभा निवडणुकीदरम्यान भेटीगाठीने चर्चांना उधाण
मोठी बातमी : सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानसभा निवडणुकीदरम्यान भेटीगाठीने चर्चांना उधाण
Devendra Fadnavis: मोठी बातमी: उमेदवारी यादी जाहीर होताच नाराजांचा जत्था फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, घडामोडींना वेग
मोठी बातमी: उमेदवारी यादी जाहीर होताच नाराजांचा जत्था फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, घडामोडींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM : 21 ऑक्टोबर   2024: ABP MajhaVijay Wadettiwar  : मविआचा 17 जागांवर तिढा कायम - विजय वडेट्टीवारABP Majha Headlines :  12 PM : 21 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सCongress Delhi : शिवसेना ठाकरे गटाच्या दबावाखाली झुकणार नाही; काँग्रेसची स्पष्ट भूमिका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट शिंदेंच्या दरबारी
दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट शिंदेंच्या दरबारी
Vijay Wadettiwar: काँग्रेसचे नेते हायकमांडला म्हणाले ठाकरेंसमोर झुकणार नाही, 17 जागांवरुन जुंपली, विजय वडेट्टीवार म्हणाले..
काँग्रेसचे नेते हायकमांडला म्हणाले ठाकरेंसमोर झुकणार नाही, 17 जागांवरुन जुंपली, विजय वडेट्टीवार म्हणाले..
Satyajeet Tambe : मोठी बातमी: सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानसभा निवडणुकीदरम्यान भेटीगाठीने चर्चांना उधाण
मोठी बातमी : सत्यजित तांबे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, विधानसभा निवडणुकीदरम्यान भेटीगाठीने चर्चांना उधाण
Devendra Fadnavis: मोठी बातमी: उमेदवारी यादी जाहीर होताच नाराजांचा जत्था फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, घडामोडींना वेग
मोठी बातमी: उमेदवारी यादी जाहीर होताच नाराजांचा जत्था फडणवीसांच्या सागर बंगल्यावर, घडामोडींना वेग
Maharashtra Assembly Elections 2024 : चांदवडमधील भाजप उमेदवारीचा चेंडू देवाभाऊंच्या कोर्टात, राहुल आहेर की केदा आहेर? फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष
चांदवडमधील भाजप उमेदवारीचा चेंडू देवाभाऊंच्या कोर्टात, राहुल आहेर की केदा आहेर? फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष
विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
विदर्भावरून घमासान! काँग्रेसच्या नेत्यांचं दिल्लीत ठाण, तर ठाकरे गट भूमिकेवर ठाम; मविआचा वाद हायकमांड सोडवणार?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार भाग्याचे; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार भाग्याचे; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, होणार अपार धनलाभ
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट, आजच्या टिंडरच्या जमान्यातही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर तब्बल 42 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'हा' चित्रपट आजही तेवढाच समर्पक; तुम्ही पाहिलाय?
Embed widget