Shani Dev : पुढचे 6 महिने शनीची 'या' राशींवर राहणार विशेष कृपा; पैशांची आवक वाढणार, प्रगतीचे दार खुले होणार
Shani In Purva Bhadrapada Nakshatra : कर्मदाता शनि सध्या पूर्व भाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे, काही राशींना शनीच्या या स्थितीमुळे चांगले दिवस येणार आहेत. तुम्हाला या काळात प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.
Shani 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, शनिच्या (Shani) राशीच्या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो. शनीची चाल बदलली की त्याचा काहींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडतो, तर काहींच्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडतो. शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह असून तो तब्बल अडीच वर्ष एकाच राशीत राहतो. सध्या शनि त्याच्या मूळ कुंभ राशीत आहे आणि 2025 पर्यंत तो या राशीत राहील. परंतु शनि वेळोवेळी नक्षत्र बदलत राहील.
शनीचा पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश
शनीने 6 एप्रिलला नक्षत्र बदललं आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला. आता शनि 3 ऑक्टोबर 2024 पर्यंत या नक्षत्रात राहणार आहे. आतापर्यंत शनि राहूच्या शतभिषा नक्षत्रात स्थित होता. आता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राहू आणि शनि एकत्र आल्याने अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी वाढल्या आहेत. तर आता शनीच्या भाद्रपद नक्षत्रातील प्रवेशामुळे अनेकांच्या जीवनात आनंद नांदणार आहे. तुम्हाला पुढील 6 महिन्यांच्या काळात शुभ परिणाम पाहायला मिळतील. पण या 6 भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीचा स्वामी शुक्र असून त्याची शनीशी मैत्रीची भावना आहे, त्यामुळे शनीची ही स्थिती वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात वृषभ राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये खूप फायदा होणार आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाची प्रशंसा मिळेल, तुमचे काम पाहून अधिकारी खुश होऊ शकतात. तुम्हाला प्रगतीसोबत प्रमोशन मिळू शकतं. नोकरीच्या ठिकाणी बरीच प्रगती दिसून येईल. वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील, संपत्तीतही वाढ होईल. तुमची रखडलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. या काळात अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. तुम्ही अनेक अडचणींपासून मुक्त होऊ शकता. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. घरातील सुखसोयी वाढवण्यासाठी पैसा खर्च कराल. परदेशातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल.
कन्या रास (Virgo)
शनीच्या नक्षत्रातील बदल कन्या राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरेल. ऑक्टोबरपर्यंतच्या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. नोकरी-व्यवसायात तुम्ही प्रगती कराल. तुमची आर्थिक स्थितीही या काळात चांगली राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रगती कराल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येतील. कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे, म्हणून योग्य तयारी करा. लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर, तुमचं लव्ह लाईफ चांगलं असणार आहे. लवकरात लवकर तुमचं लग्न ठरू शकतं. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सौभाग्य वाढेल. व्यवसायात होणारे नुकसान दूर होईल आणि एक चांगला व्यवसायिक भागीदार तुम्हाला मिळेल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र बदलाचा विशेष लाभ मिळू शकतो. या काळात तुमची व्यवसायात प्रगती होईल. भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांना विवाहासाठी चांगले प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. समाजात मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवनातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपतील आणि वैवाहिक जीवनात पुन्हा आनंद येईल. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपण बचत करण्याची चांगली योजना बनवाल. तुमचं वाहन, प्लॉट, मालमत्ता खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. कौटुंबिक समस्यांपासून सुटका मिळेल. कामाच्या ठिकाणी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या संपतील. यासोबतच नोकरीच्या अनेक नवीन संधी तुम्हाला मिळू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :