Shani Dev : शनिदेव कोणत्या लोकांना त्रास देत नाही? तुम्हालाही शनिदेवांचा आशीर्वाद हवा असेल तर 'या' गोष्टी जाणून घ्या
Shani Dev : ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांना न्यायाची देवता मानले जाते. शनिदेवाला न्याय खूप प्रिय आहे. पण शनिदेव सर्वांनाच त्रास देत नाहीत. जाणून घ्या असे कोणते लोक आहेत, जे शनिदेवाला खूप प्रिय आहेत.
Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनीला एक क्रूर ग्रह म्हणून पाहिले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ देतात. तसेच, सर्व 9 ग्रहांपैकी शनिदेव सर्वात संथ गतीने चालणारा आहे. शनीचे नाव ऐकल्यावर अनेकदा लोक घाबरतात. असे म्हटले जाते की, शनिदेवाला कधीही घाबरू नये, कारण योग्य कर्म आणि सत्याचे पालन केल्यास नेहमी शनिदेवाची कृपा प्राप्त होते. ज्योतिषशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते शनिदेव मनुष्याच्या सर्व चांगल्या-वाईट कर्मांचा हिशोब ठेवतात. यामुळेच त्यांना दंडाधिकारी असेही म्हणतात. ज्योतिषशास्त्रात काही राशी सांगितल्या आहेत, ज्यावर शनिदेव प्रसन्न होतात. जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या लोकांना शनिदेव त्रास देत नाहीत.
कोणत्या लोकांना शनिदेव त्रास देत नाहीत?
-शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. परंतु जे लोक नेहमी गरीब किंवा गरजूंची सेवा करतात त्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत. अशा लोकांवर शनिदेव नेहमी प्रसन्न राहतात.
-त्याचबरोबर ज्या लोकांचा जन्म 8 तारखेला झाला आहे किंवा त्यांच्या जन्मतारखेचे अंकीय मूल्य 8 आहे अशा लोकांवर शनिदेवाची कृपा नेहमी राहते.
-अंक 8 शनिचा प्रिय अंक आहे. 8, 17, 26 रोजी जन्मलेल्या लोकांवर शनिदेव कृपा करतात. त्यांच्या आयुष्यातही चमत्कार घडतात. हे लोक आयुष्यात खूप यशस्वी असतात.
-जे लोक दानधर्म करतात त्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत. किंवा जे लोक धार्मिक कार्यात मग्न असतात त्यांच्यावर शनिदेवाची कृपा नेहमीच असते.
-जे लोक शनिदेवासह भगवान शिव, हनुमानजी आणि श्रीकृष्ण यांची पूजा करतात, त्यांच्यावर शनिदेवाची कृपा सदैव राहते. अशा लोकांना शनिदेव शुभ फल प्रदान करतात.
शनिदेव कोणत्या राशींना त्रास देत नाहीत?
ज्योतिषशास्त्रानुसार मीन आणि धनु राशीवर शनिदेवाची कृपा असते. म्हणजे धनु आणि मीन राशीच्या लोकांना शनिदेव त्रास देत नाहीत. असे मानले जाते की या दोन राशीचे लोक खूप मेहनती असतात. यामुळे शनिदेवाची कृपा त्यांच्यावर कायम राहते.
तूळ शनिदेवाची आवडती राशी
ज्योतिषशास्त्रानुसार शनीची आवडती राशी तूळ आहे. असे म्हटले जाते की या राशीच्या लोकांना शनिदेवाचा विशेष आशीर्वाद नेहमीच मिळतो. म्हणजेच शनिदेव या राशीच्या लोकांना सहसा दुःख देत नाहीत. तूळ राशीच्या लोकांनी इतरांचे भले केले तर शनिदेव त्यांच्या प्रगतीत मदत करतात. असे लोक जीवनात उच्च पदं प्राप्त करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev : 2024 मध्ये प्रत्येक राशीसाठी शनि असेल शुभ-अशुभ, तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? जाणून घ्या