एक्स्प्लोर

Shani Dev : लोक शनिदेवांच्या डोळ्यात बघायला का घाबरतात? ही 5 रहस्ये तुम्हाला आश्चर्यचकित करतील

Shani Dev : ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवांची ज्या व्यक्तीवर शनीची वाईट नजर पडते, त्याचा वाईट काळ सुरू होतो अशी चर्चा अनेकदा केली जाते.

Shani Dev : ज्योतिषशास्त्र तसेच धार्मिक मान्यतेनुसार, सूर्य हा राजा, बुध मंत्री, मंगळ सेनापती, शनि न्यायाधीश आणि राहू-केतू प्रशासक आहेत असे मानले जाते. समाजात जेव्हा जेव्हा कोणी गुन्हा करतो तेव्हा शनि त्याला त्याच्या वाईट कृत्याची शिक्षा देतो. राहू आणि केतू शिक्षा देण्यासाठी सक्रिय होतात. शनीच्या दरबारात आधी शिक्षा दिली जाते आणि नंतर शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर त्याला पुन्हा सुख द्यायचे की नाही यावर खटला चालतो.

शनिदेवांच्या दृष्टीचे रहस्य

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि मंदिरात सरळ रेषेत उभे राहून कधीही शनि मूर्तीची पूजा करू नये. तसेच त्याची मूर्ती घरात बसवू नये. ज्या व्यक्तीवर शनीची वाईट नजर पडते त्याच्यावर वाईट काळ सुरू होतो अशी चर्चा अनेकदा केली जाते. मात्र शनीच्या मूर्तीला लोक का घाबरतात? कारण जाणून घ्या

शनीची पत्नी परम तेजस्विनी होती. एके रात्री ती मुलगा होण्याच्या इच्छेने त्याच्याकडे गेली. शनिदेव भगवान विष्णूच्या ध्यानात मग्न होते. मात्र शनिदेवांची वाट पाहून पत्नी थकली. पत्नीने संतापून शनिदेवाला शाप दिला. शनिदेवाच्या पत्नीने सांगितले की, तुमची दृष्टी ज्याच्यावर पडेल, त्याचा नाश होईल. त्यामुळे शनिदेवाच्या डोळ्यात पाहण्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.

शनीला तेल का अर्पण केले जाते?

एकदा सूर्यदेवाच्या सांगण्यावरून हनुमानजी शनीला समजावण्यास गेले. मात्र शनीला ते पटले नाही आणि युद्ध करण्यास तयार झाले. हनुमानजींनी युद्धात शनिदेवाचा पराभव केला. या युद्धात शनीला गंभीर दुखापत झाली. शनीच्या जखमा कमी करण्यासाठी हनुमानजींनी त्यांना तेल दिले. यावर शनि म्हणाले की जो कोणी मला तेल अर्पण करतो. मी त्याला त्रास देणार नाही आणि त्याचे दुःख कमी करीन. तेव्हापासून शनीला तेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली.

शनिवारी दिवे का लावतात?

शनि अंधाराचे प्रतीक आहे आणि सूर्यास्तानंतर खूप शक्तिशाली बनतो. शनीची बाधा झाली तर जीवनातही अंधार असतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी संध्याकाळी दिवा लावल्याने जीवनातील अंधार दूर होतो. शनिवारी संध्याकाळीच दिवा लावावा.

शनिदेवाचा रंग काळा का आहे?

शनिदेव हा सूर्याचा पुत्र आहे. छाया आणि सूर्य यांच्या मिलनातून शनीचा जन्म झाला. ज्योतिषशास्त्रानुसार, गर्भात असताना शनिदेव सूर्याचे तेज सहन करू शकले नाहीत आणि त्यांचा रंग काळा झाला. शनीचा रंग पाहून सूर्याने त्याला पुत्र म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. शनिला हे सहन होत नव्हते, तेव्हापासून शनि आणि सूर्यामध्ये वैर आहे.

शनिदेवाचा कोप कसा टाळावा?

जर तुम्हाला शनीचा कोप टाळायचा असेल तर इतरांबद्दल वाईट बोलणाऱ्या आणि कट रचणाऱ्या लोकांपासून दूर राहा. इतरांबद्दल वाईट विचार मनात ठेवू नका. कोणाचेही नुकसान करण्याचा प्रयत्न करू नका. कोणाचेही हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका. निष्काळजीपणा टाळा. सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. सूर्यास्ताच्या वेळी अजिबात झोपू नये.

शनि कसा प्रसन्न होईल?

गरीब आणि भुकेल्यांना शक्य तितके अन्न द्या. अन्नपदार्थ द्या. एखाद्या गरजू व्यक्तीला चामड्याचे शूज आणि चप्पल दान करा. हिवाळ्यात गरिबांना काळे ब्लँकेट दान करा. शनिवारी लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल दान करा. शनिवारी संध्याकाळी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : 2024 मध्ये शनि 'या' जन्मतारखेच्या लोकांवर बारीक नजर ठेवणार! काळजी घ्यावी लागणार, अंकशास्त्रानुसार जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सॅमसंगचा लय भारी गॅलॅक्‍सी एस 24 अल्‍ट्रा अन् गॅलॅक्‍सी एस 24 स्‍मार्टफोन्‍स लाँच, किंमत किती?  
सॅमसंगचा लय भारी गॅलॅक्‍सी एस 24 अल्‍ट्रा अन् गॅलॅक्‍सी एस 24 स्‍मार्टफोन्‍स लाँच, किंमत किती?  
Nanda Karnataki : ती एक अभिनेत्री! साखरपूडा केला, पण लग्न शेवटपर्यंत झालं नाही, तरीही प्रसिद्ध दिग्दर्शकाची विधवा म्हणून आयुष्यभर जगली
ती एक अभिनेत्री! साखरपूडा केला, पण लग्न शेवटपर्यंत झालं नाही, तरीही प्रसिद्ध दिग्दर्शकाची विधवा म्हणून आयुष्यभर जगली
Sugercane Fire : शेतातील transformer जवळ शॉर्टसर्किट, शेतकऱ्याचा 16 एकर ऊस जळून खाक, 23 लाखांचा फटका
Sugercane Fire : शेतातील transformer जवळ शॉर्टसर्किट, शेतकऱ्याचा 16 एकर ऊस जळून खाक, 23 लाखांचा फटका
All India Panther Sena : घटनेमागे भाजपचे हस्तक, ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठीच विटंबना, परभणी हिंसाचार प्रकरणी पँथर सेनेचा गंभीर आरोप
घटनेमागे भाजपचे हस्तक, ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठीच विटंबना, परभणी हिंसाचार प्रकरणी पँथर सेनेचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Opration Lotus : आम्हाला ऑपरेशन लोटस राबवण्याची गरज नाहीDevendra Fadnavis Meet Nitin Gadkari : फडणवीस दिल्लीत दाखल, गडकरींसोबत चर्चा सुरुParbhani Protest Update : परभणीत आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोडABP Majha Headlines : 04 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सॅमसंगचा लय भारी गॅलॅक्‍सी एस 24 अल्‍ट्रा अन् गॅलॅक्‍सी एस 24 स्‍मार्टफोन्‍स लाँच, किंमत किती?  
सॅमसंगचा लय भारी गॅलॅक्‍सी एस 24 अल्‍ट्रा अन् गॅलॅक्‍सी एस 24 स्‍मार्टफोन्‍स लाँच, किंमत किती?  
Nanda Karnataki : ती एक अभिनेत्री! साखरपूडा केला, पण लग्न शेवटपर्यंत झालं नाही, तरीही प्रसिद्ध दिग्दर्शकाची विधवा म्हणून आयुष्यभर जगली
ती एक अभिनेत्री! साखरपूडा केला, पण लग्न शेवटपर्यंत झालं नाही, तरीही प्रसिद्ध दिग्दर्शकाची विधवा म्हणून आयुष्यभर जगली
Sugercane Fire : शेतातील transformer जवळ शॉर्टसर्किट, शेतकऱ्याचा 16 एकर ऊस जळून खाक, 23 लाखांचा फटका
Sugercane Fire : शेतातील transformer जवळ शॉर्टसर्किट, शेतकऱ्याचा 16 एकर ऊस जळून खाक, 23 लाखांचा फटका
All India Panther Sena : घटनेमागे भाजपचे हस्तक, ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठीच विटंबना, परभणी हिंसाचार प्रकरणी पँथर सेनेचा गंभीर आरोप
घटनेमागे भाजपचे हस्तक, ईव्हीएमचा मुद्दा संपवण्यासाठीच विटंबना, परभणी हिंसाचार प्रकरणी पँथर सेनेचा गंभीर आरोप
Osho : ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Fact Check: मदरसा शिक्षकांच्या आंदोलनाचा व्हिडीओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा दावा करत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
पाटणा येथील मदरसा शिक्षकांचा व्हिडिओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा खोटा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Embed widget