एक्स्प्लोर

Shaniwar Upay : 2024 वर्षाच्या पहिल्या शनिवारी सर्वार्थ सिद्धी योग; 'या' उपायांनी दूर होणार शनीचा त्रास, होईल धनलाभ

Shaniwarche Upay : शनिवारी शनिदेव आणि हनुमानाची पूजा केल्याने सर्व ग्रहनक्षत्रांचे वाईट परिणाम कमी होतात. त्यात 2024 वर्षाच्या पहिल्या शनिवारी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत असल्याने या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे.

Shani Dev : आज 6 जानेवारी हा 2024 वर्षाचा पहिला शनिवार असून या दिवशी सर्वार्थ सिद्धी नावाचा अत्यंत शुभ योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी काही खास उपाय केल्यास आपल्यावर  शनिदेवाची (Shani) शुभदृष्टी राहते आणि साडेसातीपासून मुक्तीही मिळते.

सर्व दुःखांपासून मुक्ती आणि धनलाभासाठी सूर्यपुत्र शनिदेवाची पूजा करावी. शास्त्रात शनिदेवाला भाग्य घडवणारा असं मानलं जातं. शनिवारी काही उपाय केल्याने व्यक्तीला प्रत्येक त्रासापासून मुक्ती मिळते आणि शनिदेवाची कृपा कायम राहते. 2024 वर्षाच्या पहिल्या शनिवारी कोणते उपाय करावे? जाणून घेऊया. 

या उपायाने दूर होतील सर्व अडथळे

वर्ष 2024 च्या पहिल्या शनिवारी शनिदेवाची पूजा केल्यानंतर काळ्या कुत्र्यांना आणि काळ्या गायींना भाकरी खाऊ घालावी आणि कावळे आणि पक्ष्यांना खाऊ घालावे. तसेच गरीब आणि गरजू लोकांना तेलाचे पदार्थ खायला द्यावेत, असे केल्याने जीवनात सुरू असलेले सर्व अडथळे दूर होतात आणि शनिदेवाची कृपाही राहते.

या उपायाने उजळेल नशीब

वर्ष 2024 च्या पहिल्या शनिवारी प्रदोष काळात शनि मंदिरात बसून मन एकाग्र करा आणि शनी स्त्रोताचे 11 वेळा पठण करा. तसेच पहिल्या शनिवारी शनी किंवा शिवमंदिरात लोखंडी त्रिशूल दान करावे, असे केल्याने तुमचे नशीब उजळते आणि साडेसतीपासूनही मुक्ती मिळते. शनिवारी शनि स्त्रोताचे पठण केल्याने शनिदोषही दूर होतो.

या उपायामुळे नोकरी-व्यवसायात प्रगती होईल

वर्ष 2024 च्या पहिल्या शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली चौमुखी दिवा लावावा. तसेच उडीद डाळीपासून खिचडी बनवून शनि मंदिरात नेऊन शनिदेवाला अर्पण करून भिकाऱ्यांना खिचडी खायला द्यावी, असे केल्याने शनिदेवाच्या आशीर्वादाने नोकरी-व्यवसायात चांगली वाढ होऊन धन-ऐश्वर्य प्राप्त होते.

शनिवारी या उपायाने दूर होतील अडथळे

तुमच्या कोणत्याही कामात अडथळा येत असेल तर 2024 वर्षाच्या पहिल्या शनिवारी काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलापासून बनवलेली चपाती द्या. असे केल्याने तुमची सर्व कामं सहज पूर्ण होतील आणि तुम्हाला मेहनतीचे शुभ फळ मिळेल. तसेच शनिवारी काळे कपडे परिधान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि जीवनात आनंद येतो.

शनिवारी केलेल्या या उपायाने दूर होतील सर्व दोष

2024 मध्ये शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हनुमानाची पूजा करणे उत्तम मानले जाते. यासाठी मंगळवार आणि शनिवारी सुंदरकांडाचे पठण करून हनुमानजींना अर्पण करावे. असे केल्याने शनीचे सर्व दोष दूर होतात आणि अत्यंत कठीण परिस्थितीतूनही तुम्ही सहज बाहेर पडू शकता.

शनिवारच्या या उपायाने शनिदेव होतील प्रसन्न

2024 वर्षाच्या पहिल्या शनिवारी शनि मंदिरात मोहरीचे तेल दान करणे चांगले मानले जाते. एका वाटीत मोहरीचे तेल घेऊन ते शनि मंदिरात अर्पण करा. मोहरीचे तेल कमीत कमी 250 ग्रॅम असावे हे लक्षात ठेवा, असे केल्याने शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani : 2024 मध्ये शनीची 'या' 4 राशींवर असणार विशेष कृपा; नोकरी-व्यवसायात मिळणार सफलता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : तोंडावर एक आणि मनात एक...'या' जन्मतारखेच्या लोकांचं काही सांगता येत नाही, पटकन विश्वास ठेवत असाल तर सावधान
तोंडावर एक आणि मनात एक...'या' जन्मतारखेच्या लोकांचं काही सांगता येत नाही, पटकन विश्वास ठेवत असाल तर सावधान
Akshay Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला डबल राजयोगांचा धमाका! 3 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल, संपत्तीचा आलेख उंचावणार, तुमची रास?
अक्षय्य तृतीयेला डबल राजयोगांचा धमाका! 3 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल, संपत्तीचा आलेख उंचावणार, तुमची रास?
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी नवा आठवडा संयमाचा! अचानक आर्थिक लाभाची शक्यता, कामात प्रगती, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी नवा आठवडा संयमाचा! अचानक आर्थिक लाभाची शक्यता, कामात प्रगती, साप्ताहिक राशीभविष्य
Vastu Tips : रोज संध्याकाळी करा 'हे' 5 वास्तू उपाय; नवग्रह होतील शांत, नोकरी-व्यवसायात मिळेल यश
रोज संध्याकाळी करा 'हे' 5 वास्तू उपाय; नवग्रह होतील शांत, नोकरी-व्यवसायात मिळेल यश

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget