Shani Dev : 12 मेपासून 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस; शनि नक्षत्र बदलणार, घरात पैशांची आवक वाढणार
Saturn Transit 2024 : ज्योतिषशास्त्रात शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो, त्यामुळे शनीच्या चालीचा परिणाम एखाद्याच्या आयुष्यात दीर्घकाळ राहतो.यातच आता 12 मे रोजी शनि आपली चाल बदलणार आहे, ज्यामुळे 3 राशींचं नशीब पालटणार आहे.
![Shani Dev : 12 मेपासून 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस; शनि नक्षत्र बदलणार, घरात पैशांची आवक वाढणार Saturn Transit 2024 shani nakshatra parivartan efects on these zodiac signs will get lucky after shani nakshatra parivartan marathi news astrology Shani Dev : 12 मेपासून 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस; शनि नक्षत्र बदलणार, घरात पैशांची आवक वाढणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/06/b63b2c200426ed91641ac550e45769c7170721456675876_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shani 2024 : ज्योतिषशास्त्रात शनीला (Shani) विशेष महत्त्व आहे. या ग्रहाच्या चालीचा परिणाम व्यक्तीच्या संपत्तीवर, आरोग्यावर, प्रगती, नोकरी-व्यवसाय आणि नातेसंबंधांवर होतो. ज्योतिषशास्त्रात शनिदेव हा सर्वात संथ ग्रह मानला जातो. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी शनिदेवाला सुमारे अडीच वर्षं लागतात. यातच आता 6 एप्रिल रोजी शनीने पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या प्रथम चरणात प्रवेश केला आहे.
यानंतर 12 मे रोजी शनिदेव पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश करणार आहे, जेथे शनि 18 ऑगस्टपर्यंत राहील. शनीच्या राशीतील बदलाचा परिणाम सर्व राशींवर होईल. अशा परिस्थितीत शनीची बदलती चाल काही राशींना जबरदस्त लाभ देऊ शकते. पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात शनीच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींना सकारात्मक परिणाम मिळतील ते जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
शनीच्या नक्षत्र बदलाचा चांगलाच फायदा मेष राशीच्या लोकांना होईल. या काळात तुमचे प्रेमसंबंध चांगले राहतील. तुम्ही तुमच्या नातेसंबंधांना खूप गांभीर्याने घ्याल आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. अविवाहित लोक या काळात प्रेमात पडू शकतात. तुमचं व्यक्तिमत्व इतरांना आकर्षित करेल. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात तुमचं नाव आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल आणि प्रदीर्घ प्रलंबित कामं यशस्वीपणे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास परत येईल आणि या काळात पदोन्नतीची देखील शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे चांगले परिणाम मिळतील.
वृश्चिक रास (Scorpio)
शनीची बदलती चाल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानली जाते. या काळात वर्षानुवर्षे रखडलेल्या तुमच्या कामाला गती मिळेल. तुमच्या संपत्तीत देखील वाढ होण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या आईच्या प्रकृतीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. त्याचबरोबर हा काळ व्यावसायिकांसाठी खूप शुभ मानला जातो, तुम्हाला या काळात चांगला आर्थिक लाभ होईल. नोकरदारांनाही कामावर शुभ परिणाम पाहायला मिळतील.
धनु रास (Sagittarius)
ऑगस्टपर्यंत धनु राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असेल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि व्यावसायिकांची भरभराट होईल. परंतु, तुम्हाला तुमचा हट्टीपणा सोडावा लागेल, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. तुमची लव्ह लाईफ रोमान्सने भरलेली असेल. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या लोकांना फायदा होईल. इतर क्षेत्रात प्रवास करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळाक खर्चावर नियंत्रण ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Jayanti 2024 Date : यंदा शनि जयंती नेमकी कधी? जाणून घ्या तारीख, मुहूर्त, महत्त्व आणि उपाय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)