Shani Dev : अवघ्या 6 दिवसांत बदलणार शनीची चाल; राजासारखं जीवन जगणार 'या' राशी, सुख-सोयी, धन-संपत्तीत होणार चिक्कार वाढ
Saturn Transit 2024 : शनीच्या चालीचा परिणाम हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होत असतो. शनि शुभ स्थितीत असल्यास व्यक्तीचं झोपलेलं भाग्य देखील उजळतं. यातच आता 12 मे रोजी शनि आपली चाल बदलणार आहे, ज्यामुळे 3 राशींचं नशीब पालटणार आहे.
Shani 2024 : ज्योतिषशास्त्रात शनीला (Shani) फार महत्त्व आहे. या ग्रहाच्या चालीचा परिणाम व्यक्तीच्या सर्वच पैलूंवर होतो. शनि जर शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीचं फुटकं नशीब देखील कलाटणी घेऊन उजळू शकतं. यातच आता 6 एप्रिल रोजी शनीने पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या प्रथम चरणात प्रवेश केला आहे.
यानंतर 12 मे रोजी शनिदेव पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश करणार आहे, जेथे शनि 18 ऑगस्टपर्यंत राहील. शनीच्या राशीतील बदलाचा परिणाम सर्व राशींवर होईल. अशा परिस्थितीत शनीची बदलती चाल काही राशींना जबरदस्त लाभ देऊ शकते. पूर्वाभाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात शनीच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींना सकारात्मक परिणाम मिळतील ते जाणून घेऊया.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांना शनीच्या बदलत्या चालीचा फायदा होईल. कायदेशीर बाबींमध्ये तुमचा विजय होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. मालमत्तेतील कोणतीही जुनी गुंतवणूक तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करेल. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. त्याच वेळी, या काळात तुम्हाला आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल. कन्या राशीच्या लोकांची रखडलेली कामं देखील या काळात पूर्ण होतील.
वृश्चिक रास (Scorpio)
शनीची बदलती चाल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानली जाते. या काळात वर्षानुवर्षे रखडलेल्या तुमच्या कामाला गती मिळेल. तुमच्या संपत्तीत देखील वाढ होण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या आईच्या प्रकृतीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. त्याचबरोबर हा काळ व्यावसायिकांसाठी खूप शुभ मानला जातो, तुम्हाला या काळात चांगला आर्थिक लाभ होईल. नोकरदारांनाही कामावर शुभ परिणाम पाहायला मिळतील.
कुंभ (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचं संक्रमण शुभ मानलं जातं. कुटुंब आणि घरातील वरिष्ठ लोकांकडून तुम्हाला आशीर्वाद मिळेल. शनीच्या कृपेने समाजात तुमचं स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक गोष्टींमध्ये तुम्हाला फायदा होईल. पैशाशी संबंधित समस्याही हळूहळू दूर होऊ लागतील. नोकरदारांना या काळाच पदोन्नती मिळू शकते किंवा त्यांना भरघोस पगारवाढ मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Jayanti 2024 Date : यंदा शनि जयंती नेमकी कधी? जाणून घ्या तारीख, मुहूर्त, महत्त्व आणि उपाय