(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sankashti Chaturthi 2024 : संकष्टी चतुर्थीला चुकूनही खाऊ नका 'हे' पाच पदार्थ, अन्यथा मिळेल अनिष्ट फळ
Sankashti Chaturthi 2024 : संकष्टी चतुर्थीला अनेकांचा उपवास असतो. मात्र हे व्रत करताना काही पदार्थ हिंदूधर्मशास्त्राने वर्ज्य सांगितले आहे.
Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येत असतात. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणातात. चतुर्थी ही भगवान श्री गणेशला समर्पीत आहे. या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाती पूजा केली जाते. हिंदू धर्मशस्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावे पूज केल्या श्रीगणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते. संकष्टी चतुर्थीला अनेकांचा उपवास असतो. मात्र हे व्रत करताना काही पदार्थ हिंदूधर्मशास्त्राने वर्ज्य सांगितेल
प्रत्येक हिंदू महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थीला अनेक जणांचा उपवास असतो. परंतु संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना काय खावे आणि काय खाऊ नये या संदर्भात अनेकांच्या मनात संभ्रम आहे. जर तुम्ही संकष्टीचा उपवास करत असाल तर सर्वात उत्तम पर्याय हा फलाहार आहे. उपवासाच्या दिवशी शक्यतो सैंधव मीठाचा वापर करा. जर ते शक्य नसेल तर समुद्री मीठाचा (रोज आपण वापरतो ते पांढरे मीठ) वापर केला तरी चालेल. मात्र काळ्या मीठाचा वापर चुकूनही करू नका
संकष्टी चतुर्थीला कोणते पदार्थ खावेत?
- फळे - रसदार फळांचे सेवन करावे. उपवासामुळे शरीरातील पाणी कमी होते. ते भरुन काढण्यासाठी रसदार फळांचे सेवन करा
- शाबुदाणा- संकष्टी चतुर्थीत तुम्ही शाबुदाण्या वापर करू शकता
- दही - आंबड पदार्थ खाल्ले तरी चालेल
- चहा - उपवास करताना थकवा जाणवला तर तुम्ही चहा घेऊ शकता.
कोणते पदार्थ खाऊ नये?
- संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना जमीनीखाली उगवलेले जे पदार्थ आहे. ते खाऊ नका. गाजर, बीट, मुळा, कांदा हे खाण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केली आहे.
- फणस खाऊ नये. फणसापासून बनलेले कोणतेही पदार्थ करू नका.
- श्रीगणेशाचे व्रत करताना पूजा करताना कुठेही तुळशीचा वापर चुकुनही करू नका. कारण तुळशीचे आणि श्रीगणेशाचे सख्य नाही त्यांच्यात वैर आहे. त्यामुळे चुकुनही तुळशीचा वापर होणार नाही, याची काळजी घ्या. शिवपरिवारात तुळशीचा वापर वर्ज्य आहे.
- या दिवशी तुमच्या कुटुंबातील सदस्य मांसाहार करणार नाही.
- या दिवशी उष्ट अन्न खाऊ नये.
- मद्यपान करू नये
संकष्टी चतुर्थीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीला भगवान श्रीगणेश सर्व संकटातून बाहेर काढतात. संतती, विवाह, विद्यार्जन, करिअरमध्ये दोष असतील भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष दूर होतील.
कधी आहे संकष्टी चतुर्थी?
संकष्टी चतुर्थी 28 फेब्रुवारी रोजी असून रात्री 9.24 वाजता चंद्रोदय होईल.चतुर्थीला चंद्राची पूजा करतात, त्याच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडत नाही. राज्यातील विविध शहरांमध्ये चंद्रोदयाच्या वेगवेगळ्या असतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :