Sagittarius Horoscope Today 05 June 2023 : धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या राशीभविष्य
Sagittarius Horoscope Today 05 June 2023 : नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल.
Sagittarius Horoscope Today 05 June 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी असणार आहे. आज तुम्ही वरिष्ठ सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिकून घ्या. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. कौटुंबिक (Family) जीवनात शांतता आणि आनंद राहील, परंतु नातेवाईकांच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल परंतु सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. नोकरीतही (Job) तुमच्या बदलीची शक्यता वर्तवली जात आहे. पैसे येण्याचीही चिन्हे आहेत. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या वादात अडकणे टाळा, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आज कोणाच्याही सांगण्यावरून कोणतीही गुंतवणूक (Investment) करू नका, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.
अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल
धनु राशीचे (Sagittarius Horoscope) लोक आज कुटुंबीयांसह तीर्थयात्रेला जाण्याची योजना आखू शकतात. या ठिकाणी भेट दिल्याने तुमचे मन प्रसन्न राहील तसेच कुटुंबीयांबरोबरही चांगला वेळ जाईल. नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केले जाईल. आज तुमच्या सभोवतालचे वातावरण आनंदाचे असेल. आज तुमचे विरोधकही तुमची प्रशंसा करताना दिसतील. सत्ताधाऱ्यांशी तुमची जवळीकही वाढेल. आत्मविश्वासाने केलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. राजकीय क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी पार पाडाल. आज तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मानसिक ताणतणाव कमी होईल. तुमच्या आरोग्यात हळूहळू सुधारणा होताना दिसेल.
आजचे धनु राशीचे आरोग्य
आज धनु राशीचे आरोग्य चांगले राहील. रक्तदाबाच्या रुग्णांनी नियमित कालावधीने स्वतःची तपासणी करुन घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवा.
धनु राशीसाठी आजचे उपाय
घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीसाठी केशर, पिवळे चंदन, हळद दान करा. असे केल्याने तुमच्या घरात सुख-शांती नांदेल.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :