Rudraksh Niyam : रुद्राक्ष धारण करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान!
Rudraksh Dharan Niyam : रुद्राक्ष धारण करणाऱ्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा असते, असे मानले जाते. रुद्राक्ष धारण करण्याचे अनेक फायदे आहेत.
Rudraksh Dharan Niyam : पौराणिक कथांनुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार, रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान महादेवाच्या अश्रूंपासून झाली, असे मानले जाते. रुद्राक्ष धारण करणाऱ्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा असते, असे मानले जाते. रुद्राक्ष धारण करण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु, रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित नियम जाणून घेणे खूप आवश्यक आहे, अन्यथा त्याचा जीवनावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो. चला तर, जाणून घेऊया रुद्राक्ष धारण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात...
रुद्राक्ष धारण करण्याचे नियम :
* रुद्राक्ष धारण करताना भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा अवश्य जप करा.
* रुद्राक्ष नेहमी आंघोळीनंतर धारण करावा.
* लक्षात ठेवा की, एका व्यक्तीने धारण केलेला रुद्राक्ष पुन्हा दुसऱ्या व्यक्तीने कधीही धारण करू नये.
* रुद्राक्षाची माळ परिधान करताना त्यातील मणी विषम संख्येचे असावेत याची विशेष काळजी घ्या.
* लक्षात ठेवा की, ही रुद्राक्ष माळ 27 मणांपेक्षा कमी नसावी.
* धाग्याव्यतिरिक्त रुद्राक्ष चांदी किंवा सोन्यामध्ये जडवून देखील धारण करता येतो.
* रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने नेहमी मांस, मद्य आणि मादक पदार्थांचे सेवन टाळावे.
* रुद्राक्ष कधीही काळ्या धाग्यात धारण करू नये. त्याऐवजी ते लाल किंवा पिवळ्या रंगाचे धाग्यामध्ये गुंफणे शुभ मानले जाते.
* रुद्राक्ष अत्यंत पवित्र मानला जातो, म्हणून लक्षात ठेवा की, त्याला अशुद्ध हातांनी स्पर्श करू नये.
* सकाळी रुद्राक्ष धारण केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी रुद्राक्ष उतरवताना रुद्राक्ष मंत्र आणि रुद्राक्ष उत्यन मंत्राचा नऊ वेळा जप करावा.
* जर, तुम्ही रुद्राक्षाची माळ बनवणार असाल, तर नेहमी लक्षात ठेवा की, त्यात रुद्राक्ष विषम संख्येतच असावेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :