ॐ सूर्याय नमः| रथसप्तीमाला दूध उतू कसं अन् का घालावं? काय नैवेद्य दाखवावा, जाणून घ्या संपूर्ण विधी
Ratha Saptami 2024 : एरवी दूध सांडलं, ऊतू गेलं की हळहळणाऱ्या गृहिणी या दिवशी दूध उतू जाऊ देतात. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यापूजनाबरोबर अग्नीला दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते. जाणून घ्या कसे करावे हे व्रत....
Ratha Saptami 2024 : रथसप्तमी म्हणजे माघ शुद्ध सप्तमी हा दिवस सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभाचा सातवा दिवस, सूर्य आपला सात घोड्यांच्या रथातून उत्तरेकडे वळतो, म्हणजेच ऋतूमानात बदल होतो, थंडी संपत येते. वसंताच्या आगमनाची तयारी सुरू होते. या काळात शेतात नवे धान्य कापणीसाठी तयार होते. रथसप्तमीला (Ratha Saptami) अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम उतू घातलं जाते. दूध ज्या दिशेला उतू जाईल, तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जायचं. एरवी दूध सांडलं, उतू गेलं की हळहळणाऱ्या गृहिणी या दिवशी दूध उतू जाऊ देतात. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यापूजनाबरोबर अग्नीला दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते.
रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणार्या तापमानाचा असतो. सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. मंदिराला ज्याप्रमाणे महत्त्व असते त्याचप्रमाणे सूर्याच्या रथाला देखील विशेष महत्त्व आहे. त्यामुळे `रथसप्तमी’ ला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन करणे शुभ मानले जाते. त्याप्रमाणे दूध ऊतू घालवणे देखील शुभ मानले जाते.
दूध कसे ऊतू घालवावे?
- अग्नी देवाला हे दूध अर्पण करण्यासाठी दूध ऊतू घालवले जाते.दुपारी 12 च्या अगोदर दूध ऊतू घालवावे
- दूध अग्नीदेवाला अर्पण करण्यासाठी प्रथम एक तवा घ्या.
- तव्यावर समिधा, गौवऱ्याचे छोटे दोन ते तीन तुकडे, वाळलेल्या छोट्या काठ्या घ्या.
- दूध हे अंगणात तुळशीसमोर ऊतू घालवले जाते. जर तसे शक्य नसेल तर तुमच्या देवघरासमोर दूध ऊतू घालवावे.
- एक मातीचे भांडे घ्या. त्यात पांढरे तीळ, साखर आणि साखर चिमूटभर घाला.
- त्यात अर्ध्यापेक्षा जास्त दूध घ्या.
- भांड्यातले दूध उत्तर किंवा पूर्व दिशेल ऊतू जाईल या पद्धतीने ठेवा.
- तव्यावर समिधा प्रज्वलीत करा. त्यानंतर ही सुगड ठेवायची आहे
- दूध ऊतू घालवायचे. उरलेले दूध टाकून देऊ नका.
- उरलेल्या दुधातील चमचा-चमचा भर दूध घरातील सर्वांना प्रसद म्हणून द्या.
रथसप्तमी पूजा आणि व्रताचे महत्त्व
रथसप्तमी दिवशी स्नान, पूजा,दान या गोष्टींना विशेष महत्व आहे. या दिवशी सुर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते. तसेच रोग आणि इतर आजारापासूनही मुक्ती मिळते असे म्हणतात. रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व असते. तुम्हाला जमेल तसे दान करा. अन्नदान, धान्यदान,वस्त्रादान करा. रथसप्तमीला सूर्याला न विसरता अर्घ्य द्यावे. असे केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो.
हे ही वाचा :
Ratha Saptami 2024: रथ सप्तमी कधी आहे? पूजा कशी करायची? जाणून घ्या विधी आणि मुहूर्त
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)