एक्स्प्लोर

Rahu Transit 2022 :  राहूचा राशी बदल मीन राशीच्या लोकांसाठी ठरणार फायदेशीर 

Rahu Transit 2022 : राहुच्या राशीबदलामुळे मीन राशीच्या लोकांना शिक्षण, नोकरी, करिअर आणि बिझनेसमध्ये फायदा होणार आहे.

Rahu Transit 2022 :  मीन राशीच्या लोकांसाठी राहूचा राशी बदल फायदेशील ठरणार आहे. परंतु, या काळात मीन राशीच्या लोकांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. राहुच्या राशीबदलामुळे मीन राशीच्या लोकांना शिक्षण, नोकरी, करिअर आणि बिझनेसमध्ये कोणते फायदे होणार हे जाणून घेऊया.

येत्या काळात मीन राशीच्या लोकांनी सोशल नेटवर्क सक्रिय ठेवावे लागेल. परंतु, राहूच्या काही नकारात्मक पैलूंवर देखील बारीक लक्ष ठेवावे लागेल. मित्रांची संख्या वाढेल, पण चांगल्या संगतीलाच प्राधान्य द्यायला हवे. इंटरनेट वापराची सवय होऊ नये म्हणून सतर्क राहावे लागेल. यावेळी मीन राशीच्या लोकांना चांगले ऐकण्याची सवय लावून घ्यावी लागेल. इतरांच्या वाईट किंवा नकारात्मक वृत्तीकडे कमी लक्ष द्या.  

राहूच्या राशी बदलामुळे तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. परंतु, धाडसी आणि मेहनती बनाल. त्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव करण्यात यशस्वी व्हाल. यावेळी, तुम्हाला कार्यक्षेत्राशी संबंधित अनेक प्रवासांना जाण्याची संधी मिळेल. तुम्ही या सहलींचा चांगला फायदा देखील घेऊ शकाल. हे प्रवास तुमच्या भविष्यातही अत्यंत फायदेशीर ठरतील.

शैक्षणिक क्षेत्रात अधिक मेहनत घेणाऱ्यांना चांगले यश मिळेल. ज्यांना मोठी आरोग्य समस्या आहे, अशांनी  सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. 

मीन राशीच्या लोकांना प्रेमाच्या बाबतीत यश मिळू शकते. तुम्ही अजूनही अविवाहित असाल तर तुमच्या आयुष्यात नवीन व्यक्तीचा प्रवेश तुम्हाला आनंदित करेल. जीवनातील निराशा दूर होऊन मन प्रसन्न राहील.

मीन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणीही इतरांच्या मदतीने उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रेमामुळे तुमची प्रगती होईल. आरोग्य क्षेत्र आणि सरकारी विभागांशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला लाभ देणारा आहे. कार्यालयात कोणत्याही प्रकल्पात काम सुरू असेल तर त्याची गोपनीयता ठेवा. या प्रकल्पातून भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो.

उपाय : दर मंगळवारी हनुमानजींच्या प्रतिमेसमोर देशी तुपाचा दिवा लावून हनुमान चालिसा म्हणा. या उपायाने राहूच्या नकारात्मक प्रभावापासून मुक्ती मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)

महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
Shravan 2026 : श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
Chandra Grahan 2026: सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Shravan 2026: यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Embed widget