Rahu Ketu Gochar : 2025 वर्षात राहू-केतूचं सर्वात मोठ्ठं संक्रमण; 'या' 3 राशींना लागणार 'जोर का झटका', पदोपदी सावधानतेचा इशारा
Rahu Ketu Gochar 2024 : राहू आणि केतू ग्रहांना ज्योतिष शास्त्रात पापी ग्रह मानण्यात आलं आहे. राहू आणि केतू ग्रह प्रत्येक 18 महिन्यांनी राशी परिवर्तन करतात.

Rahu Ketu Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्ष 2025 मध्ये अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. राहू (Rahu) आणि केतू (Ketu) ग्रहांना ज्योतिष शास्त्रात पापी ग्रह मानण्यात आलं आहे. राहू आणि केतू ग्रह प्रत्येक 18 महिन्यांनी राशी परिवर्तन करतात.
सध्या राहू मीन राशीत विराजमान आहे. 18 मे 2025 रोजी राहूचं संक्रमण कुंभ राशीत होणार आहे. तर, केतू सध्या कन्या राशीत विराजमान आहे. 18 वर्षांनंतर 18 मे 2025 रोजी केतू सिंह राशीत प्रवेश करणार आहे. राहू आणि केतूच्या संक्रमणाचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, 3 राशींना सर्वात मोठा धक्का बसणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांना 18 मे 2025 नंतर सावध राहण्याची गरज आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार नाही. तसेच, तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमची जवळची व्यक्ती तुम्हाला धोका देऊ शकते. तसेच, या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाचा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. या काळात केतू ग्रहाचं संक्रमण सिंह राशीत होणार आहे. तसेच, या काळात तुमची रखडलेली कामे पूर्ण होणार नाहीत. नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. या काळात कोणाशीही पैशांचे व्यवहार करु नका. अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी 18 मे नंतरचा काळ कठीण होऊ शकतो. या राशीच्या लोकांना नवीन वर्षात अनेक संकटांचा सामना ककावा लागू शकतो. तसेच, तुम्हाला आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. ज्याचे लग्नाचे प्रस्ताव आहेत ते दूर होण्याची शक्यता आहे. तसेच, आरोग्याच्या बाबतीत सतर्कता बाळगावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Rahu Yuti : नवीन वर्षात 'या' 3 राशींवर असणार शनी-राहूची कृपा; झटक्यात पालटेल नशीब, हातातून गेलेला पैसा पुन्हा येणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
