Shani Rahu Yuti : नवीन वर्षात 'या' 3 राशींवर असणार शनी-राहूची कृपा; झटक्यात पालटेल नशीब, हातातून गेलेला पैसा पुन्हा येणार
Shani Rahu Yuti : द्रिक पंचांगानुसार, 29 मार्च 2025 रोजी रात्री 10 वाजून 07 मिनिटांनी शनी ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत राहू ग्रह विराजमान आहे.
Shani Rahu Yuti : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 हे नवीन वर्ष (New Year) अनेक अर्थाने खास असणार आहे. या नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. याचा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम होणार आहे. कर्मफळदाता शनीची (Shani Dev) 2025 मध्ये राहु ग्रहाबरोबर युती होणार आहे. याचा काही राशींवर (Zodiac Signs) शुभ परिणाम होणार आहे.
द्रिक पंचांगानुसार, 29 मार्च 2025 रोजी रात्री 10 वाजून 07 मिनिटांनी शनी ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत राहू ग्रह विराजमान आहे. यामुळे शनी आणि राहूची युती जुळून येणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी राहू आणि शनीची युती लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला नोकरीत प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांना व्यवसायात चांगला लाभ मिळेल. येणार काळ हा तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. तसेच, या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे देखील तुम्हाला मिळू शकतात.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी राहू आणि शनीची युती फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष फार शुभकारक असेल. तसेच, या काळात तुमचे अपूर्ण राहिलेले काम लवकरच पूर्ण होईल. तुमच्या कुटुंबात तुम्हाला आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुम्ही परदेशात जाण्याचा देखील प्लॅन करु शकता.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तुमची तब्येत पूर्वीपेक्षा चांगली असणार आहे. तसेच, तुम्हाला धनवृद्धीचे अनेक संकेत मिळतील. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. कामाच्या निमित्ताने तुम्ही परदेशात देखील जाऊ शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: