Ekadashi Remedies : आज वर्षातील पहिल्या एकादशीला करा तुळशीशी संबंधित 'हा' छोटा उपाय; वर्षभर नांदेल सुख-शांति, आर्थिक स्थितीही उंचावेल
Putrada Ekadashi 2025 : हिंदू पंचांगानुसार, या वर्षी 10 जानेवारीला वर्षातील पहिली एकादशी आली आहे. या दिवशी तुळशीशी संबंधित छोटे उपाय केल्याने वर्षभर सुख-संपत्ती लाभते.
Putrada Ekadashi 2025 Remedies : हिंदू धर्मात पुत्रदा एकादशीला फार महत्त्व आहे. यावर्षी पुत्रदा एकादशी 10 जानेवारी 2025 रोजी आली आहे. ही वर्षातील पहिली एकादशी आहे. या दिवशी तुळशी आणि भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. याशिवाय पुत्रदा एकादशीला स्नानाला आणि दानधर्माला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान करणं अतिशय शुभ मानलं जातं.
धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी व्रत वैकल्य केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते. त्याचबरोबर तुळस ही भगवान विष्णूची खूप प्रिय मानली जाते. अशा स्थितीत या दिवशी तुळशीशी संबंधित काही सोपे उपाय केल्यास तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येते. पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीशी संबंधित नेमके कोणते उपाय करावे? जाणून घेऊया.
तुळशीला लाल ओढणी अर्पण करा
पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीला लाल ओढणी अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. यासोबतच या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ देशी तुपाचा दिवा लावावा. असं केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात आणि भगवान विष्णू आणि देवी तुळशीचा आशीर्वाद प्राप्त होतो. यामुळे घरात सुख-शांतीही कायम राहते.
तुळशीच्या रोपाला करगोटा बांधा
एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला काळा धागा बांधणं खूप फायदेशीर मानलं जातं. असं केल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते, अशी मान्यता आहे. यासोबतच यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदही येतो आणि नात्यात प्रेम वाढतं.
तुलसी मंत्राचा जप
या दिवशी तुळशीच्या रोपाला प्रदक्षिणा घालून तुलसी मंत्राचा जप करावा. असं केल्याने घरात समृद्धी नांदते आणि आर्थिक संकटातून सुटका मिळते.
एकादशीला तुळशीशी संबंधित 'या' चुका आवर्जून टाळा
ज्योतिषशास्त्रात तुळशीच्या रोपाला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तुळशीची नित्यनियमाने पूजा केल्याने शुभ फल प्राप्त होतं. दररोज तुळशीच्या रोपाला जल अर्पण केल्याने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. मात्र, एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये.
पौराणिक कथांनुसार, एकादशीच्या दिवशी तुळशी माताही भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये, अन्यथा तुळशी मातेचं व्रत तुटू शकतं.
तुळशी माता ही भगवान विष्णूला प्रिय आहे, त्यामुळे एकादशीच्या पूजेत तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. परंतु, एकादशीच्या एक दिवस आधीच तुळशीची पानं तोडून ठेवावी. एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडणंही टाळावं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: