(Source: ECI/ABP News/ABP Majha)
October Panchak 2022 : 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार 'पंचक', चुकूनही करू नका 'हे' काम
October Panchak 2022 : कोणतेही शुभ कार्य हे शुभ मुहूर्तावरच केले जाते. असे मानले जाते की कोणतेही काम शुभ मुहूर्तावर केले तर ते यशस्वी होते.
October Panchak 2022 : हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ वेळ आणि तिथी नक्षत्र विचारात घेतला जातो. कोणतेही शुभ कार्य हे शुभ मुहूर्तावरच केले जाते. असे मानले जाते की कोणतेही काम शुभ मुहूर्तावर केले तर ते यशस्वी होते. हिंदू धर्मात पंचक हा अशुभ काळ मानला जातो. पंचक हे पाच दिवसांचे असते. हा पंचक दर महिन्याला पडत असतो. ऑक्टोबरचे पंचक पंचांगानुसार 6 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
पंचक कधी आहे ? (October Panchak 2022)
वैदिक पंचांगानुसार, ऑक्टोबर महिन्याचे पंचक गुरुवार म्हणजेच 06 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होत आहे आणि 10 ऑक्टोबर 2022 रोजी समाप्त होईल. हिंदू धर्मशास्त्रानुसार गुरुवारपासून पंचक सुरू झाल्यास ते शुभ मानले जाते.
ऑक्टोबरमधील पंचक तारखा (October Panchak 2022)
पंचक प्रारंभ : गुरुवार, 06 ऑक्टोबर 2022 सकाळी 08:28 वाजता
पंचक संपेल : सोमवार, 10 ऑक्टोबर 2022, दुपारी 04:02 वाजता
पंचकमध्ये ही 5 कामे निषिद्ध आहेत
पंचक दरम्यान बंक बनवणे किंवा विणणे अशुभ मानले जाते.
पंचक काळात गवत, लाकूड इत्यादी जळणाऱ्या वस्तू गोळा केल्या जात नाहीत. असे करणे अशुभ मानले जाते.
पंचक काळात दक्षिण दिशेला प्रवास करू नये कारण असे करणे अशुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यम आणि पितरांची मानली जाते.
पंचक काळात इमारतीवर छत टाकू नये. असे मानले जाते की असे केल्याने घरात संकट आणि धनहानी होऊ शकते.
हिंदू धर्मग्रंथानुसार पंचकमध्ये तिरडी बांधू नये, म्हणजेच अंतिम संस्कारात सहभागी होऊ नये. परंतु जर तुम्हाला तिरडी बांधायची असेल किंवा अंत्यसंस्काराला उपस्थित राहायचे असेल तर मृताच्या मृतदेहासोबत पिठाचे किंवा कुशाचे पाच पुतळे बनवावेत. असे केल्याने पंचक दोष समाप्त होतो असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या