एक्स्प्लोर

October Monthly Horoscope 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य

Monthly Horoscope October 2024 : ऑक्टोबर महिना अनेक राशींच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. ऑक्टोबरमधील 31 दिवस या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये आर्थिक लाभासोबतच गती येईल. तूळ ते मीन राशीचा ऑक्टोबर महिना कसा राहील? जाणून घ्या

October 2024 Monthly Horoscope : ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. ऑक्टोबरमध्ये ग्रह-ताऱ्यांची स्थिती अतिशय विशेष मानली जाते. ज्योतिषीय गणनेनुसार, ऑक्टोबरमध्ये सूर्य, शुक्र आणि बुध या प्रमुख ग्रहांच्या राशीत बदल होणार असून, त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल. अशात तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? जाणून घ्या

तूळ (Libra Monthly Horoscope October 2024)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा ऑक्टोबर महिना जबाबदाऱ्यांचा असेल. तुम्हाला कामावर आणि घरात महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होणार असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्याचबरोबर कुटुंबाच्या पाठिंब्याने तुमचं मन प्रसन्न राहील. या काळात तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. उत्पन्नाच्या अतिरिक्त स्रोतांमधूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना लाभ होईल.

वृश्चिक (Scorpio Monthly Horoscope October 2024)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी महिना मध्यम फलदायी असेल. या महिन्यात तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थोडे अस्वस्थ होऊ शकता. तर आर्थिक बाजूने काळ अनुकूल राहील. तुमचं प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतं. कौटुंबिक सुख-समृद्धी मध्यम राहील. वैवाहिक जीवनात सामंजस्य नसल्यामुळे थोडा तणाव राहील. प्रेमसंबंधात बदल होतील. नोकरदार वर्गासाठी महिना शुभ आहे. भागीदारांसोबत व्यवसायात काही अडचणी येतील. मुलांच्या बाजूने काही समस्या उद्भवू शकतात, त्या महिन्याच्या अखेरीस दूर होतील. यावर उपाय म्हणून सूर्याला जल अर्पण करा.

धनु (Sagittarius Monthly Horoscope October 2024)

धनु राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना फायदेशीर आहे. या महिन्यात शुभ कार्यात सहभागी होऊन तुम्हाला आनंद वाटेल. व्यावसायिकांचा नफा वाढेल. प्रवासातही तुम्हाला फायदा होईल. नोकरदार लोकांनाही त्यांच्या सुरू केलेल्या कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला अनावश्यक वाद टाळण्याचा सल्ला दिला जातो.

मकर (Capricorn Monthly Horoscope October 2024)

मकर राशीच्या लोकांसाठी महिना खूप चांगला आहेृ, परंतु या महिन्यात महत्त्वाचे निर्णय घेणं टाळावं. या महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी आनंददायी असेल. पण, तुमचा स्वभाव रागीट होऊ शकतो. तुमची चिडचिड होऊ शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. हा महिना आरोग्याच्या दृष्टीकोनातून शुभ आहे आणि आर्थिक दृष्टीकोनातून वेळ मध्यम आहे, जोखमीची गुंतवणूक टाळा, अन्यथा नुकसान सहन करावं लागेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला मित्रांसोबत फिरायला जाता येईल.

कुंभ (Aquarius Monthly Horoscope October 2024)

कुंभ राशीच्या लोकांनी ऑक्टोबर महिन्यात जे काही महत्त्वाचं काम कराल, त्यामध्ये त्यांच्या जोडीदाराचा सल्ला घ्यावा. या महिन्यात तुमची कामगिरी चांगली असेल, ज्यामुळे तुम्हाला लाभ मिळतील. प्रेमप्रकरणात वाद होतील नवीन प्रेमसंबंधही निर्माण होऊ शकतात. नोकरदार लोकांना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. या महिन्यात तुम्ही जे काही नवीन काम सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखी होईल.

मीन (Pisces Monthly Horoscope October 2024)

मीन राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना खूप चांगला जाईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल राहील. हा महिना तुमच्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगला असणार आहे. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील. विद्यार्थ्यांसाठीही काळ चांगला जाणार आहे. नोकरीत असलेल्यांना प्रलंबित कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल आणि नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. घरात धार्मिक कार्य निघण्याची शक्यता आहे. चांगल्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

October Monthly Horoscope 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget