Numerology Today 18 January 2024 : आज 'या' जन्मतारखेच्या लोकांनी बाळगावी सावधानी; आर्थिक जोखीम घेणं टाळा
Numerology Today 18 January 2024 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या.
Numerology Today 18 January 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.
मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
मूलांक 1
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. आजचा दिवस मूलांक 1 च्या लोकांसाठी आत्मविश्वासाने भरलेला असेल, पण तुम्हाला संयम राखण्याची देखील गरज आहे. आज जास्त अतिउत्साही होऊ नका. बोलताना सांभाळून बोला. गाडीच्या देखभालीवर किंवा कपडे खरेदीवर पैसे खर्च होऊ शकतात.
मूलांक 2
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. आज मूलांक 2 असलेले व्यक्ती एखाद्या कारणामुळे निराश होतील. आज कमी बोलण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यक्रमात तुमचा सहभाग असेल.
मूलांक 3
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. कामात प्रगती होईल. आजचा दिवस धावपळीचा असेल. नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिला असेल तर त्यात तुम्हाला यश मिळेल.
मूलांक 4
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 च्या लोकांचं मन आज अशांत राहील. मानसिक ताण वाढू शकतो. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. कामात एखादी अडचण येऊ शकते. आजचा दिवस खर्चिक असेल.
मूलांक 5
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 असलेल्या लोकांचं मन आज प्रसन्न राहील. आज तुमचं कौटुंबिक जीवन सुखाचं असेल, वडिलांची साथ मिळेल. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांचं सहकार्य लाभेल.
मूलांक 6
कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला असेल. घरात धार्मिक कार्य निघू शकतात. घराची सजावट आणि धार्मिक कार्यात खर्च वाढेल. आज तुमच्या घरी एखादा मित्र येऊ शकतो.
मूलांक 7
कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 च्या लोकांमध्ये आज आत्मविश्वासाची कमी असेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. कामात धावपळ होईल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.
मूलांक 8
कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 च्या लोकांची आज एखाद्या कारणावरुन निराशा होईल. राग टाळा. कोणाशीही वाद घालू नका. आजचा दिवस धावपळीचा असेल. कौटुंबिक जीवनात आनंद असेल.
मूलांक 9
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 च्या लोकांच्या जीवनात आज चढ-उतार असेल. नोकरीत प्रगतीचे मार्ग खुले होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही वाहन खरेदीचा विचार करू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: