Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांचे असतात 56 नखरे; स्वभावाने भयंकर प्रॅक्टिकल तितकेच डिमांडिंग, जणू राजेशाही स्वॅगच
Numerology Of Mulank 3 : अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 चा स्वामी ग्रह गुरु आहे.

Numerology Of Mulank 3 : वैदिक शास्त्रानुसार, ज्याप्रमाणे, राशींवरुन व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावता येतो. त्याचप्रमाणे, अंकशास्त्रावरुन (Ank Shastra) देखील एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा आणि भविष्याचा अंदाज लावता येऊ शकतो. अंकशास्त्रात मूलांकाला विशेष महत्त्व आहे. त्यानुसार, आज आपण मूलांक (Mulank) 3 विषयी जाणून घेणार आहोत.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 चा स्वामी ग्रह गुरु आहे. हा ग्रह धन संपत्ती, समृद्धी आणि बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो.
कसा असतो स्वभाव?
काही मूलांक असे असतात जे आपल्या नात्यात फार खास आणि फार वेगळ्या पद्धतीने अधोरिखित होतात. यांच्यामध्ये जोश, जिद्द आणि मोठ्या प्रमाणात आकर्षण असतं. पण, या जन्मतारखेचे लोक आपल्या पार्टनरकडून फार अपेक्षा ठेवतात. यामुळेच यांना डिमांडिंग पार्टनरचा टॅग लागतो. मूलांक 3 चे लोकदेखील काहीसे अशाच प्रकारचे असतात.
डिमांडिंग पार्टनर
या जन्मतारखेचे लोक पार डिमांड करणारे असतात. यांची आपल्या पार्टनरकडून छोट्या छोट्या गोष्टीत अपेक्षा असते. तसेच, पार्टनरचा वेळ यांच्यासाठी फार महत्त्वाचा असतो. आपल्या पार्टनरच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे यांचं बारीक लक्ष असतं.
राजेशाही स्वभाव
या जन्मतारखेचे लोक अनेकदा राजेशाही स्वभावाचे असतात. यांना प्रत्येक गोष्ट आपल्या पद्धतीने हवी असते. मग ते खाण्याच्या बाबतीत असो, पेहरावाच्या बाबतीत किंवा मग रिलेशनशिपच्या बाबतीत हे फारच डिमांड करणारे असतात.
भावनिक तसेच प्रॅक्टिकल
या जन्मतारखेचे लोक स्वभावाचे खरे असतात. पण, बुद्धीने फार प्रॅक्टिकल असतात. जर एखाद्या नात्यात यांना काही अडचण येत असेल तर हे लोक त्या नात्यापासून दूर होतात. त्यामुळेच हे लोक कोणत्याही नात्यात जास्त इन्व्हॉल्व होत नाहीत.
प्रचंड नखरे आणि डिमांड
या जन्मतारखेचे लोक प्रचंड फिल्मी असतात. प्रेमाच्या बाबतीत हे लोक फार नखरेबाज असतात. आपल्या पार्टनरची समजूत घालण्यासाठी यांना फार कष्ट करावे लागतात. तसेच, या जन्मतारखेच्या लोकांना नेहमी स्पेशल ट्रिटमेंट हवी असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















