एक्स्प्लोर

Numerology : प्रेमाच्या बाबतीत फारच लाजाळू असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हो-नाही म्हणता म्हणता गुपचूप पडतात प्रेमात

Numerology Of Mulank 1 : अंक ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो.

Numerology Of Mulank 1 : ज्योतिष शास्त्रात अंक ज्योतिष (Numerology) शास्त्राला देखील विशेष महत्त्व आहे. ज्याप्रमाणे व्यक्तीच्या राशीनुसार त्याचा स्वभाव ठरवला जातो त्याचप्रमाणे अंक ज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व ओळखता येतं. त्यानुसार, या शास्त्रात 1 ते 9 मूलांक असतात. त्याप्रमाणे मूलांक (Mulank) 1 च्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते आज आपण जाणून घेणार आहोत. 

अंक ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा स्वभाव इतरांपेक्षा फार वेगळा असतो. मूलांक 1 असणारे लोक हे आपल्या दृढ निश्चय आणि नेतृत्वासाठी ओळखले जातात. या जन्मतारखेच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव असल्या कारणाने या जन्मतारखेचे लोक प्रत्येक काम मन लावून करतात. 

कसा असतो यांचा स्वभाव?

या जन्मतारखेचे लोक फार प्रामाणिक असतात. तसेच, काही प्रमाणात हे लोक थोडेसे हट्टी आणि अहंकारीसुद्धा असतात. या लोकांमध्ये प्रचंड स्वाभिमान, अहंकार आणि महत्त्वकांक्षा असते. तसेच, सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कोणाच्याही हाताखाली किंवा अधीन राहून हे काम करु शकत नाहीत. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा अगदी धैर्याने हे लोक सामना करतात. या जन्मतारखेच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असते. मात्र, कधी-कधी हे लोक स्वार्थीही होतात.

प्रेमाच्या बाबतीत फारच असतात लाजाळू 

मूलांक 1 असणारे लोक फारच लाजाळू स्वभावाचे असतात. हे लोक कधीच आपल्या भावना आपल्या प्रिय व्यक्तीसमोर व्यक्त करत नाहीत. जवळपास या जन्मतारखेच्या लोकांचं अरेंज मॅरेजच होतं. नात्याच्या बाबतीत हे लोक सहसा गोंधळातच असतात. या मूलांकाच्या लोकांचं मूलांक 3, 4, 5, 8 आणि 9 च्या लोकांबरोबर फार पटतं. तसेच, मूलांक 4 असणारे लोक यांच्यासाठी परफेक्ट पार्टनर असतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Gochar 2024 : नाताळपर्यंत या 5 राशींची दिवाळी; 25 डिसेंबरपर्यंत जगतील राजासारखं आयुष्य, हाती येणार पैसाच पैसा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Murder : अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी सक्सेस स्टोरी
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी 'सक्सेस स्टोरी'
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

IND vs AUS Champions Trophy  : भारताची ऑस्ट्रेलियावर चार विकेट्सनी मात, 264 धावात गुंडाळलंABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 04 March 2025Job Majha : डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधीPM Modi at Vantara : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनतारा वाईल्ड लाईफचं उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Murder : अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी सक्सेस स्टोरी
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी 'सक्सेस स्टोरी'
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
BMC : महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते, फडणवीसांनी एका वाक्यात भरला दम; राष्ट्रवादीच्या नेत्यानं मंत्रि‍पद सोडलं
धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते, फडणवीसांनी एका वाक्यात भरला दम; राष्ट्रवादीच्या नेत्यानं मंत्रि‍पद सोडलं
Embed widget