Numerology : 'या' जन्मतारखेच्या मुली कमावतात अमाप पैसा; संपत्तीच्या बाबतीत मुलांनाही टाकतात मागे
Numerology : मूलांक 9 चा शासक ग्रह मंगळ आहे जो उत्साह आणि ऊर्जेचा कारक आहे. या मूलांकाला जन्मलेल्या मुली अतिशय हुशार आणि उत्साही स्वभावाच्या असतात.

Numerology : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. यामध्ये मूलांक क्रमांक 9 असलेल्या मुलींना खूप खास समजलं जातं. कोणत्याही महिन्याच्या 9,18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 9 असतो.
या मुली अतिशय उत्साही स्वभावाच्या असतात. 9 मूलांक असलेल्या मुलींना कधीही कसली भीती वाटत नाही, त्या धाडसी असतात. या मूलांकाच्या मुलींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते, त्या आपल्या मेहनतीच्या जोरावर आपलं स्थान निर्माण करतात आणि प्रगतीच्या बाबतीत मुलांनाही मागे टाकतात. या मूलांकाच्या मुलींबाबत आणखी खास गोष्टी जाणून घेऊया.
भरपूर पैसा कमवतात या मुली
मूलांक 9 चा शासक ग्रह मंगळ आहे जो उत्साह आणि ऊर्जेचा कारक आहे. या मूलांकाच्या मुली अतिशय उत्साही स्वभावाच्या असतात. या मुलींवर लक्ष्मीची विशेष कृपा असते, त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते. या मुली जीवनात खूप पैसे कमावतात. त्यांच्याकडे जमीन आणि संपत्तीही भरपूर प्रमाणात असते.
संपत्तीच्या बाबतीत मुलांनाही मागे टाकतात
कोणत्याही महिन्याच्या 9,18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या मुलींची आर्थिक परिस्थिती चांगली असते. त्या स्वत:च्या मेहनतीवर अवघं साम्राज्य उभं करतात. या मुली बराच जमीन-जुमला आणि संपत्ती खरेदी करुन ठेवतात. संपत्तीच्या बाबतीत त्या मुलांनाही मागे टाकतात. सासरच्या मंडळींकडूनही त्यांना आर्थिक लाभ मिळतो.
शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रगती करतात
9 मूलांकाच्या मुली उच्च शिक्षण घेतात, त्या शैक्षणिक क्षेत्रात प्रखर असतात. कोणताही विषय आत्मसात करण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यांना कला आणि विज्ञानात चांगली रुची असते. या शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रगती करतात आणि चांगलं शिक्षण घेतात.
खूप धाडसी असतात या मुली
9,18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या मुली खूप धाडसी असतात, धाडसी गोष्टी करायला त्यांना खूप आवडतं. या मुलींना कधीही कसली भीती वाटत नाही. कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद त्यांच्यात असते. त्यांचं जीवन काही प्रमाणात संघर्षाने भरलेलं असतं, तरी त्या त्यातून लवकर बाहेर पडतात. या मुलींना कलेची आवड असते.
प्रेम संबंध टिकत नाहीत
जर आपण लग्न किंवा प्रेम संबंधांबद्दल बोललो तर, या मुलींचे प्रेम संबंध फार काळ टिकत नाहीत. राग किंवा स्वाभिमानामुळे त्यांचे प्रेमसंबंध अनेकदा तुटतात. लक्झरी आणि लॅविश गोष्टींकडे त्यांचा कल असल्यामुळे त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















