एक्स्प्लोर

Numerology : शब्दाचे एकदम पक्के असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे बोलतात ते करुन दाखवण्याची धमक, नुसत्या तोंडाच्या वाफा हा नाही यांचा स्वभाव

Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेच्या लोकांना आपला स्वाभिमान फार प्रिय असतो. जे बोलतात ते करुन दाखवण्याची वृत्ती यांच्यात असते आणि तसं करता आलं नाही तर यांना चैन पडत नाही.

Numerology Mulank 9 : अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 9 असलेल्या लोकांचं वैशिष्ट्य खूप खास आहे.

मूलांक 9 हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. या मूलांकाचे (Numerology) लोक त्यांच्या म्हणण्यावर खरे उतरतात. हे लोक मरेपर्यंत आपला शब्द पाळतात. या लोकांना कुणासमोर झुकणं आवडत नाही. हे लोक धाडसी आणि निर्भयी देखील असतात. अंकशास्त्रानुसार, मूलांक 9 च्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. या मूलांकाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मरेपर्यंत वचन पाळतात

अंकशास्त्रानुसार, 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक प्रचंड हट्टी असतात, ते त्यांच्या शब्दांवर खरे उतरतात. हे लोक मरेपर्यंत दिलेला शब्द पाळतात. हे लोक प्रतिकूल परिस्थितीतही शांत राहतात. तसेच, ते निडर आणि धैर्यवान असतात. या लोकांना त्यांच्या स्वतःच्या जिद्दीवर कमाई करणं आवडतं. हे लोक कोणाच्याही दबावाखाली काम करत नाहीत. त्याचबरोबर ते कोणतंही काम अशक्य मानत नाहीत.

दूरदर्शी आणि स्वाभिमानी असतात

मूलांक 9 चे लोक स्वाभिमानी आणि दूरदृष्टी असतात. या लोकांना त्यांचा स्वाभिमान खूप प्रिय असतो. त्यांची कोणी फसवणूक केली तर त्यांना ते धडा शिकवूनच राहतात. याशिवाय हे लोक स्पष्टवक्तेही असतात आणि त्यांना मोकळेपणाने बोलायला यांना आवडतं. तसेच हे लोक वर्तमानावर विश्वास ठेवतात.

पटकन येतो राग

मूलांक 9 च्या लोकांना थोडा लवकर राग येतो, ज्यामुळे लोकांशी त्यांचे संबंध बिघडतात. या जन्मतारखेच्या लोकांना अगदी क्षुल्लक गोष्टीचाही पटकन राग येतो. एवढीशी गोष्ट झाली तरी ते लगेच हायपर होतात. एखाद्या माणसाचं बोलणं, वागणं पटलं नाही तर ते त्याच्यावर दात खावून येतात. या लोकांचा स्वभावच मूळात तापट असतो, त्यांना इतका राग येतो की एका वेळेनंतर ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

शिस्तीचे असतात पक्के

अंकशास्त्रानुसार, 9 मूलांकाच्या लोकांना शिस्त पाळायला आवडतं. त्यांच्या आयुष्यात कोणतीही समस्या आली तरी ते त्या समस्येला अगदी धैर्याने सामोरे जातात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:           

Numerology : प्रचंड वात्रट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांच्या खोडी काढायला असतात सगळ्यात पुढे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SCO vs AUS : ऑस्ट्रेलियामुळे इंग्लंडला मिळालं सुपर 8 चं तिकिट, स्कॉटलँडचं आव्हान संपुष्टात 
SCO vs AUS : ऑस्ट्रेलियामुळे इंग्लंडला मिळालं सुपर 8 चं तिकिट, स्कॉटलँडचं आव्हान संपुष्टात 
मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्राच्या हातात, सरकारनं 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी, खासदार ओमराजेंची मागणी
मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्राच्या हातात, सरकारनं 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी, खासदार ओमराजेंची मागणी
सोलापुरात दंगली घडवण्याचा फडणवीसांचा प्लॅन, प्रणिती शिंदेंचा आरोप; आता भाजपकडून जोरदार पलटवार, म्हणाले...
सोलापुरात दंगली घडवण्याचा फडणवीसांचा प्लॅन, प्रणिती शिंदेंचा आरोप; आता भाजपकडून जोरदार पलटवार, म्हणाले...
Mumbai Session Court on Chhagan Bhujbal : सुनावणीला हजर राहा, अन्यथा वॉरंट बजावणार! कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणात भुजबळांना सत्र न्यायालयाची तंबी
सुनावणीला हजर राहा, अन्यथा वॉरंट बजावणार! कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणात भुजबळांना सत्र न्यायालयाची तंबी
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBabanrao Taywade On Laxman Hake : ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची गरज नव्हती : बबनराव तायवाडेABP Majha Headlines : 9 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सStudent Uniform:शाळा सुरू मात्र विद्यार्थ्यांना गणवेश नाही; शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करू :Uday Samant

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SCO vs AUS : ऑस्ट्रेलियामुळे इंग्लंडला मिळालं सुपर 8 चं तिकिट, स्कॉटलँडचं आव्हान संपुष्टात 
SCO vs AUS : ऑस्ट्रेलियामुळे इंग्लंडला मिळालं सुपर 8 चं तिकिट, स्कॉटलँडचं आव्हान संपुष्टात 
मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्राच्या हातात, सरकारनं 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी, खासदार ओमराजेंची मागणी
मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्राच्या हातात, सरकारनं 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी, खासदार ओमराजेंची मागणी
सोलापुरात दंगली घडवण्याचा फडणवीसांचा प्लॅन, प्रणिती शिंदेंचा आरोप; आता भाजपकडून जोरदार पलटवार, म्हणाले...
सोलापुरात दंगली घडवण्याचा फडणवीसांचा प्लॅन, प्रणिती शिंदेंचा आरोप; आता भाजपकडून जोरदार पलटवार, म्हणाले...
Mumbai Session Court on Chhagan Bhujbal : सुनावणीला हजर राहा, अन्यथा वॉरंट बजावणार! कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणात भुजबळांना सत्र न्यायालयाची तंबी
सुनावणीला हजर राहा, अन्यथा वॉरंट बजावणार! कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणात भुजबळांना सत्र न्यायालयाची तंबी
Mohan Bhagwat : यूपीच्या राजकारणात खळबळ; RSS प्रमुख भागवतांकडून एकाच दिवसात दोनदा सीएम योगींसोबत बंद दाराआड बैठका!
यूपीच्या राजकारणात खळबळ; RSS प्रमुख भागवतांकडून एकाच दिवसात दोनदा सीएम योगींसोबत बंद दाराआड बैठका!
Ajit Pawar Pune: अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय, महापालिकेचा 'तो' अधिकार काढला, पुणे पोलिसांकडे सोपवली मोठी जबाबदारी
अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय, महापालिकेचा 'तो' अधिकार काढला, पुणे पोलिसांकडे सोपवली मोठी जबाबदारी
Nashik Crime : नाशिकमध्ये मंदिर परिसरात पोत्यात भरलेल्या मानवी कवट्या अन् हाडे सापडल्याने एकच खळबळ
नाशिकमध्ये मंदिर परिसरात पोत्यात भरलेल्या मानवी कवट्या अन् हाडे सापडल्याने एकच खळबळ
ना जीआर, ना अंमलबजावणी; मुलींना मोफत शिक्षणाची चंद्रकांत पाटलांची घोषणा हवेतच जिरली?
ना जीआर, ना अंमलबजावणी; मुलींना मोफत शिक्षणाची चंद्रकांत पाटलांची घोषणा हवेतच जिरली?
Embed widget