Numerology : 'या' तारखेला जन्मलेल्या मुली वडील आणि पतीसाठी ठरतात भाग्यवान! घरात नांदते सुख-समृद्धी
Numerology : मूलांक 2 मध्ये जन्मलेल्या मुलींचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते. या मुली मृदुभाषी आणि स्वभावाने शांत असतात.
![Numerology : 'या' तारखेला जन्मलेल्या मुली वडील आणि पतीसाठी ठरतात भाग्यवान! घरात नांदते सुख-समृद्धी numerology horoscope mulank 2 girls born on date brighten fate of father and husband marathi news Numerology : 'या' तारखेला जन्मलेल्या मुली वडील आणि पतीसाठी ठरतात भाग्यवान! घरात नांदते सुख-समृद्धी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/19/2db0f4310c74eac5be51181a8ff59059_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Numerology : अंकशास्त्रानुसार, मूलाकांची संख्या केवळ 1 ते 9 पर्यंत असते. या मूलांकात सर्वांचा जन्म झालेला असतो. मूलांक 2 मध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव अतिशय साधा आणि व्यक्तिमत्व आकर्षक असते. त्यामुळे त्यांना त्यांच्या सर्व कामात यश मिळते. 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. मुलांक 2 मध्ये जन्मलेल्या मुली त्यांच्या वडील आणि पतीसाठी खूप भाग्यवान आहेत, त्यांचे कुटुंब संपत्ती आणि सुख-समृद्धीने भरलेले असते.
देवी लक्ष्मीची सदैव कृपा
मूलांक 2 मध्ये जन्मलेल्या मुलींवर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते. कारण त्यांची वागणूक अतिशय साधी आणि लाघवी असते. शांत मन आणि दृढनिश्चय असलेल्या मुली असतात. वडिलांच्या घरात समृद्धीसोबतच ज्या घरात अशा मुलींची लग्ने होतात त्या घरात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही.
एक आकर्षक व्यक्तिमत्व
मूलांक 2 मध्ये जन्मलेल्या मुलींचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते. या मुली मृदुभाषी आणि स्वभावाने शांत असतात. त्यांच्या साध्या स्वभावामुळे घरातील सर्वांची मने जिंकतात.
अतिशय संवेदनशील असतात 2 मुलांकाच्या मुली
मूलांक 2 मध्ये जन्मलेल्या मुली त्यांच्या वडिलांच्या घरी आशीर्वाद घेऊन येतात. ते अतिशय संवेदनशील असतात आणि कोणतीही बाब अतिशय काळजीपूर्वक हाताळतात. त्यामुळे त्यांचे लग्न ज्या घरात होते ते घर स्थिरावते. घरातील त्रास होण्याची शक्यता नसते. कुटुंबातील इतर सदस्यांसोबतही त्याची वागणूक मैत्रीपूर्ण असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)