![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Numerology 28 November 2023 : आज 'या' जन्मतारखेच्या लोकांना अचानक धनप्राप्तीचे योग; अंकशास्त्रानुसार तुमचं भविष्य काय? जाणून घ्या
Numerology 28 November 2023 : काही जन्मतारखेच्या लोकांना आज आव्हानांचा सामना करावा लागेल, तर काहींसाठी आजचा दिवस खास असणार आहे. जाणून घ्या...
![Numerology 28 November 2023 : आज 'या' जन्मतारखेच्या लोकांना अचानक धनप्राप्तीचे योग; अंकशास्त्रानुसार तुमचं भविष्य काय? जाणून घ्या Numerology horoscope 28 November 2023 marathi news ank shastra aajche rashibhavishya future by date of birth moolank Numerology 28 November 2023 : आज 'या' जन्मतारखेच्या लोकांना अचानक धनप्राप्तीचे योग; अंकशास्त्रानुसार तुमचं भविष्य काय? जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/19/42f4ce6a253012163a10a16b8a95fb9b1700356475263381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Numerology Today 28 November 2023: अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.
मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
मूलांक 1
ज्यांचा जन्म 1,10, 19, 28 तारखेचा असतो, त्यांचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 च्या लोकांच्या आयुष्यात आज अनेक चढ-उतार येतील. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका आणि सर्व काम संयमाने पूर्ण करा. वैवाहिक जीवनात आनंद असेल, पण खर्च वाढू शकतो.
मूलांक 2
कोणत्याही महिन्याच्या 2,11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. तुम्ही आज मुलाखतीसाठी गेलात तर तुमची मुलाखत यशस्वी होईल कारण तुम्हाला पूर्ण आत्मविश्वास असेल. तुमचे वैयक्तिक आयुष्य चांगले दिसत आहे. व्यवसायातून आर्थिक नफा वाढेल. व्यवसायाचा आणखी विस्तार होण्याचीही शक्यता आहे.
मूलांक 3
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. आज तुमचे बोलणे चांगले राहील, सर्वजण तुमच्यावर प्रभावित होतील, परंतु तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. तुम्ही काम करत असाल तर तुमची नोकरीत ट्रान्सफर होऊ शकते. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडे चिंतेत असाल.
मूलांक 4
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. आज नोकरीत बढतीची शक्यता आहे. तुमच्यासाठी वेळ चांगला आहे. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. घरात आणि कुटुंबात सुख-शांती नांदेल. जर तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर गुंतवणुकीची शक्यता आहे.
मूलांक 5
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. या जन्मतारखेच्या लोकांसाठी आजचा काळ बदलाचा आहे. तुमच्यात बदल घडू शकतात, ते लहान किंवा मोठे असू शकतात, म्हणून धीर धरा. जर तुम्हाला कोणाशी करार करायचा असेल तर संभाषणात शांत राहा. या बदलामुळे मालमत्तेतून उत्पन्नाचे साधन निर्माण होईल.
मूलांक 6
कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 असलेल्या लोकांना आज थोडे सावध राहावे लागेल, एखादे महत्त्वाचे अभ्यास किंवा लेखनाचे काम असेल तर ते पूर्ण करा. त्रास होऊ शकतो. आज तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते.
मूलांक 7
कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. आज मूलांक 7 च्या लोकांसाठी कधी सुखाची तर कधी दुःखाची परिस्थिती असू शकते. तुम्ही दिवसभर व्यस्त असाल, काही काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही दिवसभर मेहनत कराल, तुम्हाला लाभही मिळतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. वडिलांचे सहकार्य मिळेल.
मूलांक 8
कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. आज तुम्ही कोणतेही काम विचारपूर्वक करावे. तुमचा छोटीसा निष्काळजीपणा तुम्हाला अडचणीत आणू शकते, त्यामुळे तुम्ही उत्साहात तुमचा स्वभाव गमावू नका. स्वत:वर नियंत्रण ठेवा, नोकरीच्या मुलाखती इत्यादींमध्ये तुम्हाला यश मिळेल.
मूलांक 9
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. या लोकांना आज राग टाळण्याचा सल्ला दिला आहे. स्वत:वर नियंत्रण ठेवा. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. उत्पन्न वाढेल. पण, तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायाची स्थिती सुधारेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Astrology: 2024 मध्ये 'या' राशींना होणार राजयोगाचा लाभ; मिळणार अपार धन आणि सुख
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)