Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांवर शनिची असते कृपा! सर्व कामे होतात पूर्ण, अंकशास्त्रात म्हटंलय...
Numerology : कोणत्याही व्यक्तीचा मूलांक त्याच्या जन्मतारखेवरून ओळखला जातो. अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाच्या संख्येबद्दल विशेष गोष्टी सांगितल्या आहेत, जाणून घ्या
Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाच्या संख्येबद्दल विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. या मूलांकावरून कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ओळखता येते. व्यक्तीचा मूलांक त्याच्या जन्मतारखेवरून ओळखला जातो. तुमचा जन्म 1 ते 9 च्या दरम्यान ज्या तारखेला झाला, त्याला मूलांक म्हणतात. अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांकावरून व्यक्तिमत्त्व ठरवता येते. जाणून घ्या खास गोष्टी
शनिदेवाचा खास अंक
अंकशास्त्रात 8 हा अंक खूप खास मानला जातो. कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. हा मूलांक शनीचा अंक मानला जातो. अंकशास्त्रानुसार 8 मूलांकाच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. हे लोक अंतर्मुख स्वभावाचे असतात आणि स्वतःला जगापासून दूर ठेवतात. या मुलांकाचे लोक शांत, गंभीर आणि निरागस स्वभावाचे असतात. हे लोक हळूहळू आयुष्यात यशाच्या पायऱ्या चढतात. 8 मूलांक असलेल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घ्या.
8 वा मूलांक असलेले लोक खूप मेहनती असतात.
8 वा मूलांक असलेले लोक खूप मेहनती असतात. हे लोक कठोर परिश्रमाने आपले स्थान प्राप्त करतात. या लोकांनी एकदा एखादे ध्येय निश्चित केले की ते साध्य केल्यावरच मानतात. हे लोक त्यांच्या मार्गात येणार्या अडथळ्यांमुळे कधीही निराश होत नाहीत तर पूर्ण धैर्याने त्यांचा सामना करतात. मात्र, या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात थोडा संघर्ष करावा लागतो.
पैशाच्या बाबतीत भाग्यवान
मूलांक 8 असलेल्या लोकांवर शनिदेव नेहमी दयाळू असतात. त्याच्या कृपेने त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्यांचे आर्थिक जीवन खूप चांगले असते. या मूलांकाच्या लोकांची बचत करण्याची प्रवृत्ती चांगली असते. या मूलांकाचे लोक अजिबात फालतू खर्च करत नाहीत. पैसे मिळवण्यासाठी हे लोक रात्रंदिवस मेहनत करतात. या लोकांना खूप कमी पण खरे मित्र असतात. ते मूलांक क्रमांक 3, 4, 5, 7 आणि 8 असलेल्या लोकांशी चांगले जुळतात.
प्रेम आणि वैवाहिक जीवन
अंकशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, 8 क्रमांकाचे लोक प्रेमाच्या बाबतीत भाग्यवान नसतात. असे म्हणतात की, त्यांचे प्रेमसंबंध फारसे टिकत नाहीत. त्यांच्या जोडीदारापासून वेगळे होण्याची शक्यता असते. सहसा त्यांचे लग्न उशिरा ठरवले जाते. त्यांचे कौटुंबिक जीवन सामान्य असते. त्यांचे भागीदारांशी मतभेद आढळून येतात. या मूलांकाच्या काही लोकांना अपत्य होण्यास विलंब तसेच अडचणींचा सामना करावा लागतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Numerology : हा आठवडा 'हे' मूलांक असलेल्या लोकांसाठी भाग्याचा! अंकशास्त्र जाणून घ्या