(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Numerology 10 December 2023 : 'या' जन्मतारखेचे लोक आज करणार प्रगती; आर्थिक स्थिती सुधारणार, जन्मतारखेनुसार आजचं भविष्य
Numerology 10 December 2023 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या.
Numerology 3 December 2023 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.
मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
मूलांक 1
ज्यांचा जन्म 1,10, 19, 28 तारखेचा असतो, त्यांचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 च्या लोकांना आज आयुष्यात चढ-उतारांना सामोरं जावं लागू शकतं. नवीन कामं सुरू करू नका. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात. भागीदारी व्यवसायात थोडे सावध रहा. आर्थिक नुकसान होऊ शकतं. तथापि, कुटुंब आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचं वातावरण राहील.
मूलांक 2
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. आज या लोकांच्या जीवनात आनंदाचं वातावरण असेल. आज तुमच्या व्यावसायिक जीवनात नशीब तुमची साथ देईल आणि तुम्हाला दीर्घकाळ रखडलेल्या कामांमध्ये यश मिळेल. व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. सावकाश वाहन चालवा आणि रहदारीचे नियम पाळा.
मूलांक 3
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा राहील. जिभेवर ताबा ठेवा आणि राग टाळा. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. मूलांक 3 असलेल्या लोकांनी आज वादविवादापासून दूर राहावं. आर्थिक बाबतीत यश मिळेल. मेहनतीचं फळ मिळेल आणि नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. गुंतवणुकीचे पर्याय हुशारीने निवडा.
मूलांक 4
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. आज मूलांक 4 असलेल्या लोकांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचं वातावरण असेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. अध्यात्मात रुची राहील. व्यवसायात लाभ होईल. पैशाची आवक वाढेल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे पदोन्नतीची संधी मिळेल. आज तुमचं आरोग्यही सामान्य राहील.
मूलांक 5
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 च्या लोकांना आज त्यांच्या सर्व कामात मोठं यश मिळेल. पैसा येईल, नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत नक्की घ्या, यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुमचं मन जास्त खर्चामुळे अस्वस्थ राहू शकतं, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 6
कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 च्या लोकांना आज व्यावसायिक जीवनात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. नवीन योजना सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. यामुळे कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. आज घरामध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 7
कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 च्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. व्यवसायात लाभ होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. तुम्हाला नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. कठोर परिश्रमाने केलेल्या कामात तुम्हाला मोठं यश मिळेल आणि ऑफिसमध्ये एक नवीन ओळख निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांच्या पाठिंब्याने आज तुमचं मन प्रसन्न राहील.
मूलांक 8
कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देईल. अतिरिक्त खर्चामुळे मन अस्वस्थ राहू शकते, परंतु उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे देखील मिळतील. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा समतोल राखा. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील, परंतु व्यावसायिक स्पर्धेपासून दूर राहा. जुने मित्र भेटू शकतात. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
मूलांक 9
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. आजचा दिवस संधींनी भरलेला असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. नात्यात गोडवा येईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. मन प्रसन्न राहील. मात्र, विरोधक आज सक्रिय राहू शकतात. मानसिक ताणतणाव तुमच्यावर ओढवू देऊ नका आणि कामातील आव्हानं सकारात्मकतेने हाताळा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :