November 2024 Astrology : नोव्हेंबरमध्ये 5 राशींचे 'अच्छे दिन' होणार सुरू; ऐन दिवाळीत मोठ्या ग्रहांचं परिवर्तन, प्रत्येक कामात मिळणार यश
November Grah Gochar 2024 : नोव्हेंबर महिन्यात शनि सरळ चाल चालेल. यासोबतच सूर्य, शुक्र इत्यादी ग्रहांच्या राशी बदलतील, ज्यामुळे काही राशींचं नशीब पालटणार आहे.
November 2024 Astrology : नोव्हेंबर 2024 महिना खूप खास असणार आहे. या महिन्यात अनेक मोठे ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलणार आहेत, ज्याचा परिणाम 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे पडणार आहे. शुक्र, सूर्य, शनि आणि बुध या महिन्यात राशी बदलतील. त्यामुळे या काळात कोणते ना कोणते शुभ योग बनत आहेत, ज्याचा फायदा मुख्यत: 5 राशींना होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
सूर्य संक्रमण 2024 (Surya Gochar 2024)
नोव्हेंबर महिन्यात सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल. 16 नोव्हेंबरला सकाळी 7:14 वाजता सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि 15 डिसेंबरपर्यंत या राशीत राहील. या काळात वृश्चिक, मकर, कुंभ, सिंह, मेष आणि धनु राशीच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होण्याबरोबरच तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. यासोबतच नोकरी आणि व्यवसायातही भरपूर फायदा होईल.
शनि मार्गी 2024 (Shani Margi 2024)
पंचांगानुसार, 15 नोव्हेंबरला शनि कुंभ राशीत मार्गी होईल. शनि सरळ चालीत असल्यामुळे अनेक राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकतं. या लोकांच्या जीवनातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपू शकतात. आरोग्यही चांगलं राहील, यामुळे तुमच्या जीवनात आनंद येऊ शकतो. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, कन्या आणि धनु राशीच्या लोकांना शनीच्या सरळ चालीमुळे बरेच फायदे मिळू शकतात.
शुक्र संक्रमण 2024 (Shukra Gochar 2024)
शुक्र देखील जवळपास 26 दिवसांत आपली राशी बदलतो. सुख, समृद्धी आणि संपत्ती देणारा शुक्र 7 नोव्हेंबरला आपली राशी बदलत आहे आणि धनु राशीत प्रवेश करत आहे. शुक्राचं हे संक्रमण मेष, मिथुन, कन्या, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी अद्भूत असणार आहे. या राशींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं, तसेच भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. यासोबतच या काळात तुम्हाला कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल.
मासिक राशीभविष्य नोव्हेंबर 2024 (Monthly Horoscope November 2024)
ग्रहांच्या स्थितीनुसार, नोव्हेंबर महिना अनेक राशीच्या लोकांचं भाग्य उजळवू शकतो. करिअर-व्यवसायात अफाट यशासोबतच मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. नोव्हेंबर महिन्यात मेष, वृषभ, कन्या, तूळ, कुंभ आणि धनु राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: