Rajyog : दिवाळीआधी 'या' 4 राशींना येणार सोन्याचे दिवस; बुध-शुक्र युती करणार कमाल, काही दिवसांत व्हाल मालामाल
Budh Shukra Yuti 2024 : दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, याआधीच ग्रहांचा राजकुमार आपली राशी बदलणार आहे. ग्रहांच्या राशी बदलाचा शुभ परिणाम 4 राशींवर होणार आहे आणि या राशींचं नशीब पालटणार आहे.
Laxmi Narayan Yog : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली राशी बदलतो. या राशी बदलाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. काहींसाठी ग्रहांच्या चालीतील बदल खूप शुभ ठरतो, तर काहींना या काळात नुकसानही सहन करावं लागतं. दिवाळीच्या आधी बुध ग्रह आपली राशी बदलेल, ज्यामुळे 4 राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते.
ज्योतिषीय गणनेनुसार, दिवाळीपूर्वी 29 ऑक्टोबरला बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल. सुख-सुविधेचा कारक शुक्र देखील याच राशीत आहे, त्यामुळे हे दोन्ही ग्रह मिळून लक्ष्मी नारायण योग तयार करतील. याच दिवशी धनत्रयोदशीचा पवित्र सणही साजरा केला जाणार आहे. त्यामुळे हा काळ 4 राशींसाठी खूप भाग्याचा मानला जातो. या शुभ योगांचा फायदा नेमका कोणत्या राशींना होणार? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग अतिशय शुभ ठरणार आहे. या काळात मेष राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. समाजात तुम्हाला खूप मान-सन्मान मिळेल. तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या व्यावसायिकांना बुध-शुक्र युतीचा मोठा फायदा होऊ शकतो. जे नोकरी करत आहेत, त्यांच्या पगारात वाढ होऊ शकते. पदोन्नतीचीही शक्यता आहे. वैवाहिक जीवनातील समस्यांपासून सुटका मिळेल. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतीलन सर्वांशी नातेसंबंध सुधारतील.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. नोकरीत काही अडचणी येत असतील तर त्या सोडवता येतील. याशिवाय जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या इच्छित नोकरीची ऑफर मिळू शकते. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. तुम्हाला प्रगतीच्या संधीही मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशनही मिळू शकतं. तुमचा बॉस तुमच्या कामाचा विचार करून तुम्हाला नवीन जबाबदाऱ्याही देऊ शकतो. तुम्हाला सहकाऱ्यांचंही पूर्ण सहकार्य मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: