May 2025 Monthly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी मे महिना कसा असणार? वाचा मासिक राशीभविष्य
May 2025 Monthly Horoscope : ज्योतिषीय गणनेनुसार, मे महिन्यात तूळ ते मीन राशींसाठी हा महिना कसा असेल? मासिक राशीभविष्य जाणून घ्या.

May 2025 Monthly Horoscope : 2025 वर्षाचा नवीन वर्षाचा पाचवा महिना मे 2025 लवकरच सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार,मे महिना हा काही राशींसाठी खूप खास असणार आहे. या महिन्यात ग्रह-ताऱ्यांची स्थिती अतिशय विशेष असणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, मे महिन्यात तूळ ते मीन राशींसाठी हा महिना (Monthly Horoscope) कसा असेल? मासिक राशीभविष्य जाणून घ्या.
तूळ रास (Libra Monthly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी मे महिना सामान्य असणार आहे. या कालावधीत जवळच्या फायद्यासाठी लांबचं नुकसान करु नका. तसेच,कोणाशीही पैशांची देवाण-घेवाण करु नका. करिअरच्या बाबतीत थोडाफार संघर्ष करावा लागेल. तसेच, नवीन नोकरी मिळवण्यासाठी देखील तरुणांना फार मेहनत घ्यावी लागेल. मात्र, महिन्याच्या अखेरीस तुमच्या मेहनतीला यश मिळेल. तसेच, तुमची स्वप्न साकार होतील.
वृश्चिक रास (Scorpio Monthly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मे महिना चढ-उतारांचा असणार आहे. या काळात तुम्हाला यशाबरोबरच अपयशाचा देखील सामना करावा लागेल. काही जवळचे नातेवाईक दूर होण्याची शक्यता आहे. मात्र, या गोष्टीचा जास्त विचार करु नका. सत्याच्या बाजूने वागा. तसेच, तुमच्या वागण्यामुळे कोणी दुखावणार नाही याचा विचार करा. मुलांच्या सुट्टीचा महिना असल्या कारणाने मुलांना नवनवीन गोष्टी शिकवा. निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जा.
धनु रास (Sagittarius Monthly Horoscope)
धनु राशीसाटी नवीन महिना सुख-समाधानाचा असणार आहे. या दरम्यान तुम्हाला आर्थिक कर्जातून मुक्ती मिळू शकते. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असाल. तसेच, तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून थोडं सावध राहावं लागेल. नोकरदार वर्गातील लोकांसाठी मे महिना चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी जास्त तणावाचं वातावरण नसेल. तसेच, तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. छोट्या-मोठ्या तक्रारी जाणवू शकतात.
मकर रास (Capricorn Monthly Horoscope)
मकर राशीसाठी मे महिना सकारात्मक असणार आहे. या कालावधीत तुम्ही नियोजित केलेली कामे वेळेत पूर्ण होऊ शकतात. तसेच, जुन्या चुकांमधून तुम्हाला चांगला बोध घेता येईल. तुम्ही नवीन व्यवसायाची देखील सुरुवात करु शकता. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव देता येईल.
कुंभ रास (Aquarius Monthly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र असणार आहे. या दरम्यान तुमच्या करिअर-व्यवसायाला नवं वळण मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. या कालावधीत तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. या दरम्यान कोणताच निष्काळजीपणा करु नका.
मीन रास (Pisces Monthly Horoscope)
मीन राशीसाठी मे महिना चांगला असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांसाठी महिन्याचा शेवट थोडा आव्हानात्मक असू शकतो. अशा वेळी तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. तसेच, कोणाच्याही बोलण्यात येऊ नका. धार्मिक कार्यात तुमचं मन चांगलं रमेल. तसेच, मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :




















