Rajyog : अवघ्या 5 दिवसांत मंगळ ग्रह बनवणार रुचक राजयोग; 'या' राशींचं नशीब पालटणार, होणार अपार धनलाभ
Ruchak Yog In Kundali : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रहाने मेष राशीत प्रवेश केल्यावर रुचक राजयोगाची निर्मिती होईल, ज्याचा 3 राशीच्या लोकांना विशेष फायदा होईल आणि आर्थिक लाभ होईल.
Ruchak Yog In Kundali : ज्योतिषशास्त्रानुसार, जून महिन्यात ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती फार खास ठरणार आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ 1 जून रोजी स्वतःच्या राशीत, म्हणजेच मेष राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ ग्रहाने मेष राशीत प्रवेश केल्यावर रुचक राजयोगाची निर्मिती होईल. ज्योतिषशास्त्रात हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. मंगळ (Mars) संक्रमणामुळे तयार होणारा राजयोग 12 जुलैपर्यंत चालेल. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं. या भाग्यवान ठरणाऱ्या राशी (Lucky Zodiacs) नेमक्या कोणत्या? जाणून घ्या
वृश्चिक रास (Scorpio)
रुचक राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, कारण मंगळ तुमच्या राशीचा स्वामी आहे . यावेळी तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकतं. तसेच, हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा ठरेल आणि तुम्हाला मानसिक शांती मिळेल. या काळात तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील आणि तुमचा बँक बॅलन्स वाढेल. शत्रूंवर विजय मिळवण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल.
धनु रास (Sagittarius)
रुचक राजयोगाच्या निर्मितीनंतर तुमचे चांगले दिवस सुरू होतील. या काळात तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. म्हणजे मुलाला नोकरी लागू शकते किंवा लग्न होऊ शकतं. या काळात तुमचं वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन चांगलं राहील आणि सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील. तसेच, जर तुम्ही तरुण असाल आणि तुमचे प्रेमसंबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकतं. या काळात नशिबाने साथ दिली तर तुमची अपूर्ण कामं पूर्ण होतील आणि आर्थिक लाभ देखील होईल.
कर्क रास (Cancer)
तुमच्यासाठी रुचक राजयोगाची निर्मिती शुभ ठरू शकते. कारण तुमच्या राशीच्या कर्माच्या घरात मंगळ जाणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात मोठं यश मिळू शकतं. तसेच, नोकरदार लोकांना दुसऱ्या एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते आणि तुम्ही व्यवसायात तुमचा ठसा उमटवण्यात यशस्वी व्हाल. दुसरीकडे, जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तसेच या काळात बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :