Margashirsh Pournima 2024: आज 2024 वर्षातली शेवटची पौर्णिमा खास! या शुभ मुहूर्तावर कराल पूजा, आर्थिक लाभ, सुख-समृद्धी येईल
Margashirsh Pournima 2024: तुम्हाला माहितीय का? आज 2024 वर्षातली शेवटची पौर्णिमा कधी आहे, धार्मिक ग्रंथानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तर जाणून घेऊया महत्त्व आणि पूजेची पद्धत..
Margashirsh Pournima 2024: हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी जगाचे पालनकर्ते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच गंगा स्नान करणे अधिक शुभ मानले जाते. अशी धार्मिक मान्यता आहे की, ही शुभ कार्ये केल्याने व्यक्तीचे सुख-समृद्धी वाढते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. वर्षातील शेवटची पौर्णिमा डिसेंबरमध्ये येते, जी मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेची तिथी आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. धार्मिक ग्रंथानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तर जाणून घेऊया या पौर्णिमेचे महत्त्व आणि पूजेची पद्धत..
मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी
हिंदू कॅलेंडरनुसार, मार्गशीष महिन्याची पौर्णिमा 14 डिसेंबर रोजी दुपारी 04:58 वाजता सुरू होईल. त्याच वेळी, ही पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 डिसेंबर रोजी दुपारी 02:31 वाजता संपेल. अशा परिस्थितीत 15 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा उत्सव साजरा केला जाणार आहे.
मार्गशीर्ष पौर्णिमेची पूजा कशी कराल?
- मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा, सकाळी उठून स्नान करावे.
- या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप शुभ मानले जाते,
- परंतु जर ते शक्य नसेल तर स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करू शकता.
- यानंतर घरातील मंदिर स्वच्छ करावे.
- त्यानंतर घरातील मंदिरात दिवा लावा.
- त्यानंतर सर्व देवी-देवतांना गंगाजलाने अभिषेक करावा.
- त्यानंतर विधीनुसार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा.
- त्यानंतर गंगाजल श्री हरीला अर्पण करावे, ज्यामध्ये तुळशीचा समावेश करावा.
- नैवेद्य दाखवल्यानंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आरती करावी.
- त्यानंतर संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्राची पूजा करून अर्घ्य द्यावे. अ
- से केल्याने सर्व दोषांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते.
- या दिवशी पूजा केल्यानंतर दान करावे.
मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार विधीनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी उपवास केल्यास जीवनात सुख-शांती राहते. याशिवाय व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
शुभ मुहूर्त
सूर्यास्त - संध्याकाळी 05:26
चंद्रोदय- संध्याकाळी 05:14 पासून
ब्रह्म मुहूर्त - 05:17 AM ते 06:12 AM
विजय मुहूर्त - दुपारी 02:56 ते 02:41 पर्यंत
संध्याकाळ - संध्याकाळी 05:24 ते 05:51 पर्यंत
अमृत काल- संध्याकाळी 06:06 ते 07:36 पर्यंत
हेही वाचा :
Margashirsha Purnima 2024 : यंदाची मार्गशीर्ष पौर्णिमा 3 राशींसाठी ठरणार खास; 15 डिसेंबरपासून नशीब उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्सही वाढणार
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)