Mangal Margi 2025 : मंगळ चालणार सरळ चाल; 24 फेब्रुवारीपासून 'या' 3 राशींचा 'गोल्डन टाईम' होणार सुरु, हातात खेळणार पैसा
Mangal Margi 2025 : 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी मंगळ ग्रह मार्गी होणार आहे. मंगळ ग्रह मिथुन राशीत मार्गी झाल्याने अनेक राशींना याचा लाभ मिळू शकतो.
Mangal Margi 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ (Mars) ग्रह एका निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात. याचा प्रत्येक राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडतो. सध्या मंगळ ग्रह कर्क राशीत वक्री स्थितीत विराजमान आहे. तर, 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी मंगळ ग्रह मार्गी होणार आहे. मंगळ ग्रह मिथुन राशीत मार्गी झाल्याने अनेक राशींना याचा लाभ मिळू शकतो. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
सध्या मंगळ ग्रह दुसऱ्या चरणात मार्गी होणार आहेत. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. करिअरमध्ये तुमच्या चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमची वेतनवाढ देखील होऊ शकते. त्यामुळे हा काळ तुमचा आनंदात जाईल. तुम्ही पाहिलेली स्वप्न लवकरच साकार होतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या अकराव्या चरणात मंगळ ग्रह मार्गी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तसेच, नशिबाची तुम्हाला चांगल साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. या काळात समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसेल. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा आणि आनंदाचा असणार आहे. या काळात नवव्या चरणात मंगळ मार्गी होणार असल्या कारणाने तुमच्यासाठी हा काळ चांगला ठरेल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तुमचं कौतुक केलं जाईल. या काळात तुमचं प्रमोशनही होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तुमचं उत्पन्न देखील वाढेल. त्यामुळे तुम्ही फार आनंदी असाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :