Astrology : आज बनला शुभ मंगळ गुरू परिवर्तन योग; मेषसह 5 राशींच्या लोकांच्या जीवनात घडणार चांगले बदल
Mangal Guru Parivartan Yog : आज सुकर्म योग, लक्ष्मी नारायण योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे आजचा दिवस मेष, सिंह राशीसह 5 राशींसाठी फायदेशीर असणार आहे. आज या 5 राशींवर हनुमानाची कृपाही असेल. आजच्या शुभ राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Mangal Guru Parivartan Yog : आज मंगळवार, 30 जानेवारीला चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर मंगळ आणि गुरू एकमेकांच्या राशीत स्थित आहेत, त्यामुळे राशी परिवर्तन योग तयार होत आहेत. तसेच आज माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून या दिवशी परिवर्तन योगासह सुकर्म योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज तयार होत असलेल्या शुभ योगांचा विशेष फायदा होणार आहे. या राशींना सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी दिवस चांगला राहील आणि गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. या 5 भाग्यवान राशींबद्दल (Zodiac Signs) जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
आजचा, म्हणजेच 30 जानेवारीचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. आज मेष राशीच्या लोकांच्या जीवनात समृद्धी नांदेल आणि तुमच्या वागण्यात सकारात्मक दृष्टीकोन असेल. तुम्ही कामाच्या ठिकाणी प्रगतीचा मार्ग स्वीकाराल, तुम्ही कठीण प्रसंगांवर सहज मात कराल आणि पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाल. हनुमानाच्या कृपेने तुमच्यामध्ये समस्यांशी लढण्याची ताकद येईल, ज्यामुळे तुम्ही प्रतिकूल परिस्थितीला सहजपणे सामोरे जाल. विविध योजनांमध्ये केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ राहील आणि खर्च नियंत्रणात ठेवल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगलं राहील आणि मानसिक शांती राहील.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा म्हणजेच, 30 जानेवारीचा दिवस लाभदायक असणार आहे. सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस प्रगतीचा असेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून काही चांगलं काम करू शकाल, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला भेटाल, जी तुम्हाला वर नेऊ शकते. पैसे कमावण्यासाठी नवीन कल्पना येतील आणि तुम्ही त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. नातेवाईकांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचे झाले तर, तुमच्या जोडीदारासोबत काही गैरसमज झाले असतील तर ते दूर होतील आणि संबंध चांगले राहतील.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा म्हणजेच, 30 जानेवारीचा दिवस अनुकूल राहील. तूळ राशीच्या लोकांना हनुमानाच्या आशीर्वादाने आज चांगला आर्थिक लाभ होईल आणि व्यवसायात चांगली वाढ होईल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि तुमची संपत्ती वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आज तुम्ही कोणतेही काम कराल, त्यात तुम्हाला पूर्णपणे यश मिळेल आणि सरकारी अधिकाऱ्यांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला काही सरकारी योजनेचा फायदा होईल आणि कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक जीवनाविषयी बोलायचे झाले तर, कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल आणि काही धार्मिक कार्यक्रमही आयोजित करता येतील. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि तुम्ही एकत्र काही जमीन खरेदी करू शकता.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा म्हणजेच, 30 जानेवारीचा दिवस सकारात्मक असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना नशीब साथ देईल, ज्यामुळे तुमची अनेक महत्त्वाची कामं पूर्ण होतील आणि काही मालमत्तेबाबत सुरू असलेला वादही सोडवला जाईल, ज्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडू शकाल. आज तुम्ही तुमच्या वडिलांच्या मदतीने नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करू शकता आणि सोशल मीडियावर तुमच्या फॉलोअर्सची संख्या लक्षणीय वाढेल. मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्यामध्ये धैर्य वाढेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि ते इतर कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करू शकतात. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील आणि आरोग्यही चांगले राहील.
कुंभ रास (Sagittarius)
आजचा म्हणजेच, 30 जानेवारीचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. आज तुम्हाला आर्थिक फायदा होईल आणि काही चांगली बातमी मिळाल्याने तुम्ही दिवसभर आनंदी राहाल. प्रेमात पडलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल, तुम्ही तुमच्या जोडीदाराला खूप दिवसांनी भेटाल. नोकरदार लोकांना करिअरच्या प्रगतीसाठी शुभ संधी मिळतील आणि ते पैसे कमवण्याचे इतर मार्गही शोधतील. आर्थिक सुधारणेमुळे तुमच्यासाठी आवश्यक वस्तू खरेदी करणे सोपे होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :