एक्स्प्लोर

Astrology : मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे बनणार महा दरिद्र योग; 'या' 5 राशींची होणार आर्थिक हानी, चारही बाजूंनी घुसमट

Maha Daridra Yog : महा दरिद्र योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. या राशींना आर्थिक नुकसानासोबतच व्यवसाय आणि नोकरीमध्ये अडचणी येऊ शकतात.

Mahadaridra Yog : ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह ठराविक काळानंतर राशी बदलतात, ज्याचा परिणाम प्रत्येक राशीवर होत असतो. काही राशींसाठी ग्रहांची स्थिती चांगली असते, तर काहींसाठी ती अशुभ ठरते. यातच आता 1 जूनला मंगळ (Mars) ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. 

यावेळी शनि, राहू, मंगळ, गुरू, बुध आणि शुक्र एकाच रेषेत येतील आणि यावेळी महादरिद्र योगाची निर्मिती होईल. या अशुभ योगामुळे काही राशीच्या लोकांना धनहानीसह अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. नेमक्या कोणत्या 5 राशींना (Zodiac Signs) या योगाचा फटका बसणार? पाहूया.

मेष रास (Aries)

महादरिद्र योगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. कामात कोणत्या ना कोणत्या मार्गाने अडथळे निर्माण होऊ शकतात. तुम्हाला प्रमोशनसाठी अजून थोडी वाट पहावी लागेल. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं तर, तुम्ही भरपूर पैसे कमवाल, परंतु जास्त खर्चामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. यासोबतच तुमच्या आरोग्याबाबतही तुम्हाला या काळात थोडं सावध राहावं लागणार आहे.

मिथुन रास (Gemini)

या योगाची निर्मिती मिथुन राशीच्या लोकांसाठी हानिकारक सिद्ध होऊ शकते. या काळात छोट्या-छोट्या कामांसाठीही तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते. एखादा प्रकल्प किंवा डील फिक्स होण्यासाठी वेळ लागू शकतो, ज्यामुळे तुमचं लक्ष कामावरून हटू शकत. कुटुंबात किंवा जोडीदाराशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. या काळात व्यावसायिकांनी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे टाळावी. हा काळ तुमच्यासाठी संघर्षाचा ठरू शकतो.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी महादरिद्र योग लाभदायक ठरणार नाही. कोणतंही काम करताना सावधगिरी बाळगा, कारण या काळात तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. वैवाहिक नात्यात दुरावा येऊ शकतो, त्यामुळे अनावश्यक राग टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जीवनात अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कन्या रास (Virgo)

या राशीच्या लोकांसाठीही महादरिद्र योग चांगला सिद्ध होणार नाही. या राजयोगाच्या निर्मितीमुळे तुम्हाला भरपूर पैसे मिळतील, पण तुम्हाला एक पैसाही वाचवता येणार नाही. अनावश्यक खर्चामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. नोकरीच्या ठिकाणी काही कारणावरून भांडण होऊ शकतं, यामुळे भविष्यात तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. कोणताही निर्णय थोडा विचार करूनच घ्या. जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, ज्या तुम्हाला ताकदीने सोडवाव्या लागतील. आरोग्याबाबतही थोडं सावध राहण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, कारण आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी महादरिद्र योग धोक्याचा ठरेल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात कोणत्या ना कोणत्या मार्गाने अडथळे सहन करावे लागतील. तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे तुम्हाला कर्ज घेण्याची गरज भासू शकते. नोकरदार लोकांच्या जीवनावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. व्यवसायात कोणत्याही प्रकारचे व्यवहार करणं टाळा, कारण यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

जूनमध्ये सूर्य, शनिसह 6 मोठ्या ग्रहांच्या चाली बदलणार; 'या' 4 राशींची डोकेदुखी वाढणार, संकटं येण्याआधीच व्हा सतर्क

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde On Maharashtra Cabinet: नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
Maharashtra Weather Update: मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Kalyan attack marathi family: कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचे दिवस फिरले, पोलिसांनी दिव्याचा तोरा उतरवला, आरटीओने दंड ठोठावला
कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचा तोरा उतरवला, मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 21 December 2024TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :  7 AM : 21 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 20 December 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde On Maharashtra Cabinet: नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंनी दिला सबुरीचा सल्ला; म्हणाले, जसे मला लाडका भाऊ हे मोठे पद...
Maharashtra Weather Update: मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात थंडीचा कडाका झाला कमी , येत्या 24 तासांत..
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Kalyan attack marathi family: कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचे दिवस फिरले, पोलिसांनी दिव्याचा तोरा उतरवला, आरटीओने दंड ठोठावला
कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचा तोरा उतरवला, मोठी कारवाई
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
Embed widget