Mangal And Budh Yuti 2025 : तब्बल 100 वर्षांनी दिवाळीला मंगळ-बुध ग्रहाच्या युतीचा योग; 'या' 3 राशींची होणार चांदीच चांदी, पडणार पैशांचा पाऊस
Mangal And Budh Yuti 2025 : दिवाळीला मंगळ आणि बुध ग्रहाची युती तूळ राशीत जुळून येणार आहे. यामुळे यंदाच्या दिवाळीला काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे.

Mangal And Budh Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, यंदाची दिवाळी फार खास आहे. कारण यंदा दिवाळीच्या (Diwali 2025) शुभ मुहूर्तावर अनेक ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. यामुळे अनेक शुभ राजयोग (Rajyog) देखील निर्माण होणार आहे. अशातच ग्रहांचा सेनापती मंगळ आणि व्यवसायाचा दाता ग्रह बुध यांची युती होणार आहे. दिवाळीला मंगळ आणि बुध ग्रहाची युती तूळ राशीत जुळून येणार आहे. यामुळे यंदाच्या दिवाळीला काही राशींचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. या शुभ राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी मंगळ आणि बुध ग्रहाचा संयोग फार लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या अकराव्या चरणात हा संयोग जुळून येतोय. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, देवी लक्ष्मीच्या तुमच्यावर सदैव कृपा राहील. करिअरमध्ये अनेक नवीन संधी तुम्हाला मिळतील. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील या काळात वाढण्याची शक्यता आहे. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करु शकता.
कन्या रास (Virgo Horoscope)
मंगळ आणि बुध ग्रहाचा शुभ संयोग कन्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. कारण या राशीच्या धन आणि वाणी स्थानी हा योग जुळून येतोय. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला परत मिळू शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या वाणीत मधुरता ठेवावी लागेल. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल. तुमचं रखडलेलं प्रोजेक्ट देखील याच काळात सुरु होईल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी मंगळ आणि बुध ग्रहाचा हा संयोग सकारात्मक ठरणार आहे. या राशीच्या कुंडलीतील चतुर्थ स्थानी हा शुभ योग जुळून येणार आहे. त्यामुळे या दरम्यान तुमच्या भौतिक सुख-संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, व्यवसायात तुम्हाला अनेक संधी मिळचील. कामाच्या नवीन ऑर्डर्स येतील. तसेच, तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला या काळात मिळू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :




















