Vidur Niti : माणसाच्या 'या' सहा सवयी आहेत सुखी जीवनातील सर्वात मोठा अडथळा, आजच करा बदल
Vidur Niti : माणसाच्या अंगी असलेल्या काही सवयी त्याच्या सुखी जीवनातील सर्वात मोठा अडथळा असतात.
Vidur Niti : विदुर नीती हे महात्मा विदुर आणि धृतराष्ट्र यांच्या म्हणींचे संकलन आहे असे म्हटले जाते. विदुर नीतीमध्ये माणसाच्या सवयींबद्दल देखील सांगण्यात आले आहे. माणसाच्या आयुष्यातील 6 सवयी अशा आहेत ज्या माणसाचे आयुष्य नरक बनतात. वेळीच या सवयी बदलल्या नाहीत तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील मोल्यवाण वेळ वाया घालवताय असे म्हणता येईल. जाणून घेऊनया या सहा सवयींबद्दल.
Vidur Nit i: राग
राग हा माणसाचा सर्वात मोठा दोष आहे. माणसाने कधीही जास्त रागावू नये. रागाच्या भरात एखादी व्यक्ती अशा काही गोष्टी करते ज्याचे नुकसान तो आयुष्यभर भरून काढू शकत नाही.
Vidur Niti : स्वार्थाची भावना
विदुर नीतीनुसार माणसाचा स्वार्थ त्याला आयुष्यभर दु:ख देत राहतो. त्याला जीवनात सुख-शांती हवी असेल तर त्याग आणि समर्पणाची भावना स्वतःमध्ये ठेवावी लागेल. स्वार्थाचा त्याग केला तर माणसाला आयुष्यात यश मिलाल्याशिवाय राहणार नाही.
Vidur Niti : मित्रांची फसवणूक
विदुर नीतीनुसार जो व्यक्ती मित्रांची फसवणूक करतो तो कधीही मित्राचे सुख मिळवू शकत नाही. विदुरच्या मते अशा लोकांचे आयुष्य खूपच कमी असते. शिवाय असे लोक जीवनात कधीच यशस्वी होत नाहीत.
Vidur Niti : लोभी असणे
विदुर नीतीनुसार लोभी व्यक्ती कधीही आनंदी राहू शकत नाही. म्हणूनच माणसाने लोभ कायमचा सोडला पाहिजे.
Vidur Niti : गर्व
विदुर नीतीनुसार, व्यक्तीने कधीही अतिआत्मविश्वास नसावा. जगाला अहंकारी माणूस कधीच आवडत नाही. त्यांचे आयुर्मान कमी असते.
Vidur Niti : अति बोलणे
विदुर नीतीनुसार कधीही जास्त बोलू नये. माणसाने नेहमी कमी आणि अचूक बोलले पाहिजे. जाणूनबुजून किंवा नकळत अशी माणसे कधी कधी अशा गोष्टी बोलतात, ज्याचे परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावे लागतात. अशी व्यक्ती कधीही आनंदी होऊ शकत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)