Mahashivratri 2025: आज महाशिवरात्री, भगवान शंकराच्या पूजेत 4 प्रहरचे मोठे महत्त्व! पूजेची योग्य पद्धत, मुहूर्त, सर्वकाही जाणून घ्या.
Mahashivratri 2025: महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहर पूजेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हालाही शिवरात्रीच्या चार प्रहरांची पूजा करायची असेल तर जाणून घ्या येथील पूजा पद्धती आणि शुभ मुहूर्त.

Mahashivratri 2025: हिंदू धर्मात माघ कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकराला समर्पित असे महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. महाशिवरात्री व्रताच्या दिवशी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे. असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी जो व्यक्ती बिल्वाच्या पानांसह भगवान शंकराची पूजा करतो आणि रात्री जागृत राहून देवाच्या मंत्रांचा जप करतो, त्याला भोलेनाथांची विशेष कृपा प्राप्त होते. यंदा 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीचे व्रत केले जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने व्यक्तीला विशेष फळ प्राप्त होते. याशिवाय, तरुणी विशेषत: महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करतात जेणेकरून त्यांना त्यांच्या आवडीचा सुंदर, मनासारखा वर मिळावा.
महानिशिथ काळाचे महत्त्व
महाशिवरात्रीच्या दिवशी, विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठी अनेक लोक महानिशिथ काळात भगवान शंकराची पूजा करतात. 26 फेब्रुवारी रोजी रात्री 11.47 ते 12:37 पर्यंत महानिशिथ काळ असेल. याशिवाय मान्यतेनुसार या दिवसापासून सृष्टी सुरू झाली. माघ कृष्ण चतुर्दशीला महानिशिथ काळात भगवान शिव लिंगाच्या रूपात प्रकट झाले. म्हणूनच आजच्या महानिशिथ काळात शिवपूजेला विशेष महत्त्व आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहरात अशा प्रकारे भगवान शिवाची पूजा करा.
महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरात शिवलिंगाला दुधाने, दुसऱ्या प्रहरात दही, तिसऱ्या प्रहरात तूप आणि प्रहरात मधु म्हणजेच मधाने स्नान करावे.
प्रत्येक प्रहारात शिवलिंगाला स्नान घालताना वेगवेगळ्या मंत्रांचाही जप करावा. पहिल्या प्रहारात 'ह्रीं ईशानाय नमः।', दुसऱ्या प्रहरमध्ये 'ह्रीं अघोराय नमः।', तिसऱ्या प्रहरमध्ये 'ह्रीं वामदेवाय नमः।' आणि चौथ्या प्रहारात 'ह्रीं सद्योजाताय नमः।' मंत्रोच्चार करताना शिवलिंगाला स्नान घालावे.
याशिवाय या दिवशी दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या प्रहारात उपवास करणाऱ्या व्यक्तीने पूजा, अर्घ्य, जप आणि कथा श्रवण करावी, असाही उल्लेख शास्त्रात आहे. तसेच स्तोत्रांचे पठण करून देवाला नमस्कार करावा.
तर दुसऱ्या एका मतानुसार, चंदनाच्या लेपने शिवाची पूजा करावी. यावेळी तीळ, तांदूळ आणि तूप मिसळून शिजवलेला भात अग्नीत अर्पण करावा. त्यानंतर हवनानंतर एक संपूर्ण फळही नैवेद्य म्हणून अर्पण करावे. सामान्यतः लोक नारळ फळ देतात.
याशिवाय या दिवशी शिवकथा पाठ करून पुन्हा मध्यरात्री, तिसऱ्या आणि चौथ्या प्रहरात नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा उच्चार करावा.
महाशिवरात्री 4 प्रहार पूजा मुहूर्त 2025
रात्री प्रथम प्रहर पूजा वेळ - 18:43 ते 21:47
रात्री द्वितीय प्रहर पूजा वेळ - 21:47 ते 00:51, (27 फेब्रुवारी)
रात्री तृतीया प्रहर पूजा वेळ - 00:51 ते 03:55, (27 फेब्रुवारी)
रात्री चतुर्थ प्रहर पूजा वेळ - 03:55 ते 06:59, (27 फेब्रुवारी)
हेही वाचा>>>
Mahashivratri Wishes 2025 In Marathi: हर हर महादेव..! महाशिवरात्रीनिमित्त भक्तिमय फोटोसहित शुभेच्छा संदेश तुमच्या प्रियजनांना पाठवा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )




















