MahaShivratri 2023: महाशिवरात्रीला शिवपूजनाने हे 4 ग्रह शांत होतील, 'या' उपायांनी मिळेल सुखशांती!
MahaShivratri 2023: यावर्षी 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री साजरी होणार आहे. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर महादेवाची पूजा केल्याने चार ग्रहांच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे.
MahaShivratri 2023 : धर्मग्रंथानुसार शिव (Lord Shiv) हे विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश यांचे शासक आहेत, असे म्हटले जाते की, माता पार्वती आणि शिवशंकर यांचा विवाह महाशिवरात्रीच्याच (Mahashivratri 2023) दिवशी झाला. या दिवसाची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी पूजा केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात आणि शुभ फळ प्राप्त होतात. यंदा महाशिवरात्री 18 फेब्रुवारी 2023 रोजी साजरी होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिव ही एकमेव अशी देवता आहे. ज्याच्या उपासनेने देवता, गंधर्व आणि राक्षसांनाही उपासनेचे पूर्ण फळ मिळते. भगवान शिव हे त्रिमूर्तीमध्ये देवाधिदेव मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर महादेवाची पूजा केल्याने चार ग्रहांच्या त्रासापासून मुक्ती मिळते, जाणून घ्या महाशिवरात्रीला भोलेनाथाची पूजा केल्याने कोणते ग्रह शांत होतात?
महाशिवरात्रीला या चार ग्रहांच्या त्रासापासून मिळेल आराम!
राहू
जन्मपत्रिकेत राहूच्या त्रासामुळे माणसाला प्रत्येक पावलावर दुःखांना सामोरे जावे लागते, मृत्यूसारख्या दु:खाला सामोरे जावे लागते. शास्त्रानुसार शिवाची पूजा केल्याने राहूमुळे होणारे त्रास लवकर संपतात. महाशिवरात्रीच्या दिवशी निशित काल मुहूर्तावर दुर्वा आणि कुश गवत पाण्यात मिसळून भगवान शिवाला अभिषेक करा. असे मानले जाते की, यामुळे राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि जीवन आनंदी होते. राहूची महादशा चालू असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाचा पंचाक्षरी मंत्र 11 वेळा बोलावा
शनि
भगवान शिवाला शनीचे गुरु मानले जाते. भगवान शिवाने शनीला दंडाधिकारी ही पदवी दिली होती. शनीच्या साडे सती आणि ढैय्याचा प्रकोप टाळण्यासाठी महाशिवरात्रीला उसाचा रस आणि काळे तीळ अर्पण करून शिवलिंगाची पूजा करावी. विशेषत: शिवाला शमीपत्र अर्पण करा आणि शिवपुराण पाठ करा. असे मानले जाते की यामुळे शनिदोषापासून मुक्ती मिळते.
मंगळ
जन्मपत्रिकेत मंगळाची वाईट स्थिती एखाद्या व्यक्तीची शांती हिरावून घेते. क्षुल्लक मुद्द्यावरून वाद वाढू लागतात. नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध सर्वच तुटू लागतात. महाशिवरात्रीला मंगळाच्या शांतीसाठी गंगेच्या पाण्यात लाल चंदन, लाल फुले, गूळ टाकून शिवलिंगाचा जलाभिषेक करावा, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या दरम्यान ओम नमो भगवते रुद्राय नमः मंत्राचा जप करा. शिव तांडव स्तोत्राचे पठण करावे. याने मंगळ दोष दूर होतो असे म्हणतात.
चंद्र
भगवान शंकरांनी चंद्राला आपल्या मस्तकावर स्थान दिले आहे. भोलेनाथाची पूजा करणाऱ्यांना चंद्राच्या अशुभ प्रभावांना सामोरे जावे लागत नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्राला शांत करण्यासाठी विशेष पूजा केली जाते. निशिता काल मुहूर्तावर या दिवशी चांदीच्या भांड्यातून दूध अर्पण करावे आणि रुद्राक्षाच्या जपमाळेने ॐ श्रां श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः या मंत्राचा जप करावा. या उपायाने मानसिक आणि शारीरिक त्रासापासून आराम मिळतो.
महाशिवरात्रीला शिवाची पूजा करून मिळवा कुबेरांच्या आशीर्वादांचा वर्षाव
कुबेरांना देवांचे खजिनदार म्हणतात. भगवान शिवाने कुबेरांना संपत्तीची देवता म्हणून घोषित केले होते. महाशिवरात्रीला शिवालयात मनुजवाह्य विमानवरस्थितं गुरुडरत्नानिभं निधिनाकम। शिव संख युक्तादिवि भूषित वरगदे दध गतं भजतांदलम।। या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने देव कुबेर प्रसन्न होतात. हा कुबेर देवाचा दुर्मिळ मंत्र आहे. या मंत्राचा जप करण्यापूर्वी एखादे नाणे हातात ठेवा. नामजप संपल्यानंतर हे नाणे आपल्या पर्समध्ये किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. त्यामुळे पैशाची कमतरता भासणार नाही, असा विश्वास आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Mahashivratri 2023: महाशिवरात्रीला राशीनुसार पूजा करा, महादेव होतील प्रसन्न! जाणून घ्या कोणता मंत्र देईल यश?