Magh Pournima 2024 : तब्बल 13 वर्षांनंतर माघ पौर्णिमेला बनले अनेक शुभ योग; 'या' 4 राशींवर राहणार महालक्ष्मीची कृपा
Magh Pournima 2024 Astrology : उद्या, म्हणजेच 24 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा आहे. या शुभ दिनी रुचक राजयोग, लक्ष्मी योगासह अनेक दुर्मिळ योग तयार होत आहेत, त्यामुळे माघ पौर्णिमेचं महत्त्व अधिक वाढलं आहे. हे सर्व योग 4 राशींसाठी लकी ठरणार आहेत.

Magh Pournima 2024 : माघ महिन्याची पौर्णिमा खूप खास असते. यंदा माघ (Magh) पौर्णिमा 24 फेब्रुवारीला आहे आणि या दिवशी तब्बल 13 वर्षांनंतर अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी मंगळ मकर राशीत असल्याने रुचक योग निर्माण होईल. माघ पौर्णिमेला रुचक योगाची निर्मिती अतिशय शुभ मानली जाते. याशिवाय यंदा माघ पौर्णिमेला (Magh Pournima 2024) अनेक शुभ योग तयार होत आहेत.
माघ पौर्णिमेला लक्ष्मी योगाचा शुभ संयोग होत आहे. शिवाय, बुध आणि सूर्य कुंभ राशीत एकत्र असल्याने 24 फेब्रुवारील बुधादित्य राजयोग देखील बनत आहे. यासोबतच, शनि आपल्या मूळ त्रिकोण राशीत राहून शश योगाची निर्मिती करेल. या दुर्मिळ योगांमुळे 4 राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळेल. माघ पौर्णिमेला 4 राशींवर देवी लक्ष्मीची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीसाठी पौर्णिमेचा दिवस खास असणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात विशेष यश मिळेल. या काळात तुमची लव्ह लाईफ देखील चांगली असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. तुमचं मानसिक आरोग्य देखील चांगलं राहील. तुम्हाला पूर्ण दिवस सकारात्मक ऊर्जा जाणवेल. दिवस प्रसन्न राहील. जीवनात चांगले बदल घडतील.
मिथुन रास (Gemini)
माघ पौर्णिमेच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांना चंद्र अधिक सुख प्रदान करेल. या दरम्यान तुमच्या कुटुंबात सुख-शांति नांदेल. तुमच्यात आत्मविश्वास दिसून येईल. सर्व कामांमध्ये यश मिळेल. तुम्हाला भावंडांकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक प्रवासातून तुम्हाला डबल लाभ मिळेल. या काळात शत्रूंपासून सावध राहा.
सिंह रास (Leo)
माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र तुमच्या राशीतच असेल. अशात चंद्राची शुभ दृष्टी तुमच्यावर पडेल. या काळात सिंह राशीच्या लोकांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. तुमच्या स्वभावात नम्रता दिसेल. तुमचं आरोग्य या काळात तंदुरुस्त राहील. तुम्ही तुमच्या नोकरी-व्यवसायात बुद्धीचा योग्य वापर कराल. नोकरी-व्यवसायात तुम्हाला चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा देखील मिळेल.
तूळ रास (Libra)
माघ पौर्णिमेला तूळ राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला एखाद्या कार्यात भावाचं सहकार्य लाभेल. नोकरी-व्यवसायातील निर्णय तुम्हाला चांगला लाभ देतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. तुम्हाला शिक्षक आणि वडिलांचं पूर्ण सहकार्य मिळेल, तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Magh Pournima 2024 : उद्या माघ पौर्णिमा! तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
