Libra Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : तूळ राशीसाठी 13 ऑक्टोबरपर्यंतचा काळ कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Libra Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : तूळ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा चढ-उतारांचा असणार आहे. संकटं येण्याआधी आधीच सावध राहण्याची गरज तुम्हाला पडेल.
Libra Weekly Horoscope 07 To 13 October 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, ऑक्टोबर महिन्यातील पहिला आठवडा संपत आला आहे. लवकरच नवीन आठवड्याला सुरुवात होणार आहे. हा नवीन आठवडा तूळ राशीसाठी नेमका कसा असणार आहे? तूळ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा तूळ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी तूळ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ राशीची लव्ह लाईफ (Libra Love Horoscope)
नवीन आठवड्यात तुमच्या जोडीदाराशी बोलताना थोडी सावधगिरी बाळगा, तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या जोडीदाराचा गैरसमज होऊ शकतो, यामुळे नात्यात मोठी दरी निर्माण होऊ शकते. जुन्या प्रेम प्रकरणामुळे वाद होऊ शकतात, त्यामुळे अधिक वाद टाळण्याचा प्रयत्न करा. तुमचा प्रियकर काही गोष्टी ढवळून काढू शकतो, परंतु तुम्हाला ते मुत्सद्दीपणे हाताळावं लागेल. जे सिंगल आहेत किंवा ज्यांचा नुकताच ब्रेकअप झाला आहे, त्यांना आठवड्याच्या सुरुवातीला एखादा खास व्यक्ती भेटू शकतो, जो भविष्यात त्यांचा जोडीदार बनेल.
तूळ राशीचे करिअर (Libra Career Horoscope)
तुम्ही करिअर संबंधित प्रवास करू शकता. या आठवड्यात नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला बिझी ठेवतील. कोणत्याही वादापासून दूर राहून नोकरीवर लक्ष केंद्रित करा. शास्त्रज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञ, इंजिनीअर, आयटी व्यावसायिक आणि इंटेरिअर डिझायवर्सना चांगल्या संधी मिळतील. काही व्यावसायिकांना अपमानाचा सामना करावा लागू शकतो, परंतु निराश होऊ नका. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यावसायिक हा आठवडा शुभ मानू शकतात.
तूळ राशीची आर्थिक स्थिती (Libra Wealth Horoscope)
या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या तुमची स्थिती चांगली असेल. या आठवड्यात तुम्हाला प्रगती दिसेल, परंतु खरेदीवर जास्त पैसे खर्च करू नका. उद्योजकांसाठी हा आठवडा चांगला राहील, कारण हा आठवडा ते आपला व्यवसाय उच्च पातळीवर नेतील. काही तूळ राशीच्या लोकांना कुटुंबात मालमत्तेशी संबंधित समस्या असू शकतात. काहींना त्यांच्या कुटुंबासाठी किंवा वैद्यकीय खर्चासाठी पैशांची गरज भासेल.
तूळ राशीचे आरोग्य (Libra Health Horoscope)
या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या असू शकतात. आपल्या आहाराकडे लक्ष द्या आणि तेल आणि चरबीयुक्त पदार्थ टाळा. आज तुम्हाला सांधेदुखीशी संबंधित समस्या देखील असू शकतात. नवीन आठवड्यात सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा. योग आणि ध्यान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: