एक्स्प्लोर

Libra Monthly Horoscope May 2024 : तूळ राशीसाठी मे महिना आव्हानांचा; 'या' गोष्टींची घ्यावी लागणार विशेष काळजी, मासिक राशीभविष्य जाणून घ्या

Libra Monthly Horoscope May 2024: तूळ राशीच्या लोकांसाठी मे महिना कसा राहील? मे महिन्यात ग्रहांच्या परिवर्तनाचा तूळ राशीच्या लोकांवर कसा परिणाम होईल? मासिक राशीभविष्य जाणून घ्या.

Libra May Horoscope 2024 : तूळ राशीच्या लोकांसाठी मे महिना संमिश्र परिणाम देणारा असेल. तूळ (Libra) राशीच्या लोकांसाठी मे महिन्याचा सुरुवातीचा काळ खूप चांगला जाणार आहे. पण महिन्याच्या मध्यातून काही समस्या उद्भवू शकतात. महिन्याच्या मध्यापासून तुम्हाला करिअर, व्यवसाय इत्यादींबाबत आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना थोडा काळजीचा असेल.

तूळ राशीच्या लोकांसाठी मे महिना कसा असेल? या महिन्यात तुम्हाला भाग्याची किती साथ मिळेल? तुमचं वैवाहिक जीवन कसं असेल? तुम्हाला धनलाभ होईल की नाही? आणि शिक्षणाच्या बाबतीत महिना (Monthly Horoscope) कसा राहील? सर्व गोष्टी जाणून घेऊया.

तूळ राशीचे करिअर (May Career Horoscope Libra)

तूळ राशीसाठी महिन्याची सुरुवात चांगली असेल, परंतु मध्यानंतर तुम्हाला नोकरी-व्यवसायात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू तुमच्याविरोधात कुरघोड्या करतील. तुम्हाला सहकाऱ्यांकडून कमी पाठिंबा मिळेल आणि त्यामुळे तुमच्या मनात थोडी निराशेची भावना निर्माण होईल. महिन्याच्या शेवटी ज्या बाबींवरुन तुमच्यावर टीका होत होती त्यामध्ये तुम्ही यशस्वी परिणाम सिद्ध कराल आणि सर्व जण तुमचं कौतुक करतील.

तूळ राशीचे आर्थिक जीवन (May Wealth Horoscope Libra)

मे महिना आर्थिकदृष्ट्या सामान्य असेल. तुम्हाला व्यवसायातून अपेक्षित लाभ मिळेल. महिन्याच्या सुरुवातीला लॉटरी किंवा सट्टेबाजीतून धनलाभ होईल. मधल्या आणि शेवटच्या भागात कुठेही पैसे गुंतवू नका, कारण अचानक आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सट्टेबाजीच्या मोहात पडू नका आणि पैसे कमी खर्च करा. ज्यांची बँकेत कर्जाची प्रकरणं चालू आहेत, त्यांनी त्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी. बँकेकडून तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या महिन्यात कर्ज घेणं टाळणं तुमच्यासाठी चांगलं राहील, त्यामुळे कर्जाच्या व्यवहारापासून दूर राहा.

तूळ राशीचे कौटुंबिक जीवन (May Family Horoscope Libra)

नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा महिना सामान्य राहणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला मित्र आणि भावंडांसोबत काही मतभेद होतील, परंतु नंतर परिस्थिती सुधरेल. कुटुंबातील सदस्यांशी घरात चांगले संबंध राहतील. तुमच्या आई-वडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील.

तूळ राशीची लव्ह लाईफ (May Love Horoscope Libra)

प्रेमप्रकरणात सावधगिरीने पुढे जा. तुमच्या प्रियकराला असं कोणतंही वचन देऊ नका, जे तुम्हाला भविष्यात पूर्ण करणं शक्य होणार नाही. 

तूळ राशीचे आरोग्य (May Health Horoscope Libra)

आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना थोडा कमजोर वाटतो. त्यामुळे या महिन्यात आरोग्य आणि आहाराची विशेष काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Virgo May Horoscope 2024, Monthly Horoscope : करिअर, आर्थिक स्थिती आणि लव्ह लाईफच्या दृष्टीने मे महिना कसा असणार? वाचा कन्या राशीचं मासिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget