Nazar Dosh : तुमच्या मुलाला किंवा व्यवसायाला नजर लागली तर घाबरू नका, करा 'हे' उपाय
Nazar Dosh : कोणत्याही व्यक्तीची वाईट नजर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करू शकते असे मानले जाते.
Nazar Dosh : आपल्या घरातील लहान चिमुकल्याला नजर लागली असे म्हटले जातो. नजर लागण्याबाबत आपण नेहमीच ऐकत आलो आहे. एखाद्याच्या नजर दोषाचा परिणाम मनुष्यावर होतो असे मानले जाते. लोकांचा असा विश्वास आहे की नरजेतील दोष एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम करतो. त्यामुळे अनेक चांगले चालणारे व्यवसाय आणि रोजगारावर देखील वाईट परिणाम होते. याबरोबरच कोणत्याही कामात अडथळे येतात.
नजर लाण्याल्याची लक्षणे
असे मानले जाते की कोणत्याही व्यक्तीची वाईट नजर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करते. घर, वाहने, दुकाने, खाद्यपदार्थ या सर्वांवर एकाच वेळी वाईट नजर पडते. अशा परिस्थितीत झालेली नजर दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया.
तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलाला नजर लागली आहे तर लगेचच मुलाच्या डोक्यावरून हात फिरवा. असे केल्याने नजर दोष दूर होतो असे मानले जाते.
जर एखाद्या मुलाला नजर लागल्यामुळे ते सतत रडत असेल किंवा स्वभावाने चिडचिड होत असेल तर यासाठी तांब्याच्या भांड्यात ताजी फुले टाकून मुलाच्या डोक्यातून 11 वेळा उतरून काढा. असे केल्याने लागलेली नजर दूर होते असे म्हणतात.
असे मानले जाते की जर घरातील कोणत्याही सदस्याची नजर लागली असेल तर नियमितपणे सुंदरकांडचे पठण केले पाहिजे. तसेच घरात हलकी अगरबत्ती लावावी. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
तुमच्या चांगल्या चाललेल्या व्यवसायाला नजर लागली तर व्यवसायाच्या ठिकाणी लाल रंगात हनुमानाचा फोटो लावा आणि त्याला नियमितपणे लाल रंगाची फुले अर्पण करा. तसेच धंद्याच्या ठिकाणी शंखामध्ये पाणी शिंपडावे. असे केल्याने व्यवसाय पुन्हा चांगल्या प्रकारे चालू लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :