Ketu Gochar 2024 : केतूचा सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश, 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य; अचानक धनलाभाचे मिळतील संकेत
Ketu Gochar 2024 : सूर्य आणि केतू ग्रहात तसं पाहिल्यास शत्रुत्वाचं नातं आहे. त्यामुळे या काळात काही राशींवर संकट ओढावू शकतं. पण, काही राशी अशाही आहेत ज्यांना या काळात चांगला लाभ मिळू शकतो.
Ketu Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, केतूला (Ketu) मायावी ग्रह म्हणतात. केतू हा नेहमी उलटी चाल चालतो. आणि जवळपास प्रत्येक राशीत 18 महिन्यांपर्यंत राज्य करतो. नुकतंच 10 नोव्हेंबर रोजी केतूने सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश केला. सूर्य आणि केतू ग्रहात तसं पाहिल्यास शत्रुत्वाचं नातं आहे. त्यामुळे या काळात काही राशींवर संकट ओढावू शकतं. पण, काही राशी अशाही आहेत ज्यांना या काळात चांगला लाभ मिळू शकतो. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी केतूचं संक्रमण भाग्याचं ठरणार आहे. या दरम्यान तुम्ही फार खुश असाल. तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी लाभतील. तसेच, जर तुमच्यावर कर्ज असेल तर त्याच्यातून देखील तुम्हाला मुक्ती मिळू शकते. तसेच, तुमच्या घरात एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाऊ शकतं. नोकरदार वर्गातील लोकांना सहकाऱ्यांची चांगली साथ मिळले.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी केतुचं संक्रमण फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला छोट्या-मोठ्या लाभाच्या संधी मिळतील. या काळात तुमचे नवीन संपर्क देखील वाढू शकतात. नोकरदार वर्गातील लोकांना सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, एखाद्या शुभ कार्यात तुम्ही मोठ्या आनंदात सहभागी व्हाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फार लाभदायक असणार आहे. या काळात तुमचे एके ठिकाणी अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, तुमच्या आरोग्यातही चांगली सुधारणा झालेली दिसेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल. नोकरी-व्यवसायात देखील तुम्हाला चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :